अकरावीच्या वर्गांचे टाईमटेबल; या लिंकवर सुरु आहेत अकरावीचे आँनलाईन वर्ग

मुंबई :  दिवाळीच्या सुट्टीनंतर आज ३ डिसेंबर पासून अकरावीचे आँनलाईन वर्ग सुरू करण्यात आले आहेत. आर्ट्स, काँमर्स आणि सायन्स या तीनही शाखांचे दैनिक तासिकांचे तपशीलवार वेळापत्रक हे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या लिंकवर उपलब्ध आहे.

अकरावीचे प्रवेश रखडल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने युट्यूबच्या माध्यमातून आँनलाईन वर्ग सुरू केले आहेत. काँलेज सुरू होईपर्यत तीनही शाखांच्या मराठी व इंग्रजी माध्यमासाठी झूम व युट्युब लाईव्हच्या माध्यमांतून अभ्यासक्रम सुरू करण्यात आला असल्याचे परिषदेचे उपसंचालक विकास गरड यांनी सांगितले.

आँनलाईन वर्गासाठी लिंकवर क्लिक करा

https://covid19.scertmaha.ac.in/eleventh