क्रेडिट कार्डच्या बिलांना कंटाळून उचलले टोकाचे पाऊल परंतु…..

लॉकडाऊनमध्ये त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची बनली होती. यामुळे क्रेडिट कार्डचे ८०००० रुपयांचे बिल देणे जमले नाही. दुसरीकडे क्रेडिट कार्ड कंपनीचे कर्मचारी, रिकव्हरी एजंट सतत बिल भरण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकत होते. एजंटांच्या धमक्यांपासून सुटका करून घेण्यासाठी संबंधित व्यक्तीने मृत्यूला कवटाळण्याचा निर्णय घेतला.

बदनामी आणि रिकव्हरी एजंटांच्या धमकीचे फोन कॉल्समुळे त्रस्त झाल्याने मुलुंडमधील व्यक्तीने मरण्यापूर्वी पत्नीला मेसेज पाठविला होता. हा मेसेज डीएसपींपर्यंत पोहोचला आणि मुंबई पोलिसांनी सुत्रे हलविली. “आयुष्यातून जात आहे, माफ करा”; क्रेडिट कार्डच्या बिलांना कंटाळून टोकाचे पाऊल उचलले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित ३२ वर्षीय व्यक्ती मुलुंडमध्ये राहते . लॉकडाऊनमध्ये त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची बनली होती. यामुळे क्रेडिट कार्डचे ८०००० रुपयांचे बिल देणे जमले नाही. दुसरीकडे क्रेडिट कार्ड कंपनीचे कर्मचारी, रिकव्हरी एजंट सतत बिल भरण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकत होते. एजंटांच्या धमक्यांपासून सुटका करून घेण्यासाठी संबंधित व्यक्तीने मृत्यूला कवटाळण्याचा निर्णय घेतला.

बदनामी आणि रिकव्हरी एजंटांच्या धमकीचे फोन कॉल्समुळे त्रस्त झाल्याने त्यांनी तलावात उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी उडी मारण्यापूर्वी पत्नीला मेसेज पाठविला होता. यामध्ये ”आयुष्यातून जात आहे, माफ करा”, असे लिहिले होते. घाईगडबडीत हा मेसेज त्यांच्या पत्नीने सोशल मीडियावर पोस्ट केला. हा मेसेज एका सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याने पाहिला. हा मेसेज त्यांनी एका समाजसेवी संस्थेला पाठविला तिथून तो झेन ७ चे डीसीपी प्रशांत कदम यांना फॉरवर्ड झाला. डीसीपी यांनी तातडीने सूत्रे हलवत केवळ ७ ते ८ मिनिटांत संबंधित व्यक्ती यांच्या मोबाईल नंबरवरून त्यांच्या लोकेशनचा पत्ता शोधला. लगेचच आजुबाजुला असलेल्या पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलीस व्यक्तीच्या जवळ पोहोचले आणि त्यांना या टोकाच्या निर्णयापासून वाचविले.