केंद्राच्या कृषी कायद्यात दुरूस्ती करणार; महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

केंद्र सरकारचे तीन कृषी कायदे शेतकरी आणि ग्राहकांना मदत करणारे नाहीत.  त्यामुळे त्यात दुरूस्ती केल्याशिवाय ते राज्यात लागू केले जाणार नसल्याचे आज स्पष्ट झाले.

  मुंबई (Mumbai).  केंद्र सरकारचे तीन कृषी कायदे शेतकरी आणि ग्राहकांना मदत करणारे नाहीत त्यामुळे त्यात दुरूस्ती केल्याशिवाय ते राज्यात लागू केले जाणार नसल्याचे आज स्पष्ट झाले. याबाबत राज्य सरकारच्या उपसमितीची बैठक उपमुख्यमंत्री अजीतपवार यांच्या  उपस्थितीत पार पडली. या बैठकीला कृषीमंत्री दादा भुसे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित होते.

  वाढली~https://www.navarashtra.com/bhandara-news-marathi/the-drains-in-the-storehouse-were-filled-with-dirt-citizens-headaches-increased-nrat-109669/”]

  थोरात म्हणाले की, आधारभूत किंमत केंद्राच्या कायद्यात नाही ती असावी, अजूनही काही दुरुस्त्या आहेत तसा कायदा करण्यासाठी बैठक झाली. शेतकरी, ग्राहकांच्या हिताचा कायदा राज्य सरकार करणार आहे. असे ते म्हणाले. यावेळी बोलताना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, शेतकरी हिताचा कायदा असला पाहिजे, आधारभूत किंमत शेतकर्‍यांना मिळावी अशी भूमिका आहे. तसा कायदा करण्यासाठी बैठक झाली.

  रुग्ण वाढ तिथे कँटोन्मेंट झोन
  राज्यात टाळेबंदीच्या निर्णयावर बोलताना ते म्हणाले की,  स्थानिक पातळीवर ज्या भागात कोरोनाचे रुग्ण वाढतायत तिथे कँटोन्मेंट झोन केले जात आहेत. त्या करीता लोकांनी सर्व नियमांचे पालन केले तर ही बाब रोखता येईल असे शिंदे म्हणाले. या बाबत महसूलमंत्री थोरात म्हणाले की, कोरोनाच्या संख्या वाढण्याचा वेग पाहता एप्रिल महिन्यात कठीण परिस्थिती निर्माण होईल. अशाच गतीने आकडे वाढत राहिले तर हे रोखायचे कसे हा प्रश्न आहे. लॉकडाऊनच्या मतांचे कुणीही नाही, आम्हीही नाही, लोकांनी सहकार्य करायला हवे असेही थोरात म्हणाले.

  केंद्र सरकारचे तीन कृषी कायदे शेतकरी आणि ग्राहकांना मदत करणारे नाहीत त्यामुळे त्यात दुरूस्ती केल्याशिवाय ते राज्यात लागू केले जाणार नसल्याचे आज स्पष्ट झाले. याबाबत राज्य सरकारच्या उपसमितीची बैठक उपमुख्यमंत्री अजीतपवार यांच्या  उपस्थितीत पार पडली.