हा सॉलिड फंडा अवलंबल्यास कोणत्याच गाडीमुळे तुमच्यावर रस्त्यावरील चिखल उडणार नाही

तरुणी लगेच आपलं डोकं चालवते. ती गाडी आपल्या जवळ यायच्या आधीच रस्त्यावरील एक दगड उचलते आणि आपल्या हातात धरून उडवते. तरुणीवर चिखल उडवण्याच्या तयारीत असलेला गाडीचालक घाबरतो आणि तो आपली गाडी थांबवतो त्यानंतर गाडीचा वेग कमी करून अगदी धीम्या गतीने रस्त्यावरून पुढे सरकतो.

  मुंबई : पावसाळा (Rain) म्हटलं की सर्वात मोठं आव्हान असतं ते रस्त्यावरून चालणं आणि त्यातही गाड्यांपासून चिखल (Mud) आपल्या अंगावर उडण्यापासून वाचणं (Splashing mud by the car on road). आपल्याजवळ रस्त्यावर पाणी किंवा चिखल आहे आणि एखादी गाडीसुद्धा येत आहे. त्यावेळी बहुतेक वेळा तर गाडीचालक मुद्दामहून चिखलातून वेगाने गाडी चालवतोच. त्यामुळे आपणच शहाणपणा करत रस्त्याच्या एका कडेला उभं राहतो, जिथं गाडीमुळे आपल्यावर चिखल उडणार नाही आणि सर्वात आधी गाडीलाच जाऊ देतो. पण कितीही बचावाचा प्रयत्न केला तर चिखल हा उडतोच. पण सोशल मीडियावर (Social media) याचा जबरदस्त फंडा व्हायरल (Viral video) होत आहे.

  एका तरुणीने गाडीमुळे उडणाऱ्या चिखलापासून वाचण्यासाठी एकदम सहज सोपा असा उपाय दाखवला आहे. तरुणीचा हा व्हिडिओ सोशल (Funny video) मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे.

  व्हिडिओत पाहू शकता, एकदम छोटासा रस्ता आहे. हा रस्ता पूर्णपणे चिखलानेच माखला आहे. पाय ठेवावं अशी थोडीशीही जागा नाही. त्यात ही तरुणी कडेकडेनं चिखलात आपला पाय जाणार नाही याची काळजी घेत कसंबसं चालताना दिसते आहे. इतक्यात तिच्या मागून एक कार येते.

  तरुणीला कारचा आवाज येताच ती मागे वळून पाहते. आता तरुणीला तर इथं एका बाजूला उभं राहायला जागासुद्धा नाही. त्यामुळे आपल्यावर चिखल उडणारच याची तिला कल्पना तिला आहेत. गाडीसुद्धा अगदी वेगाने तिच्या जवळ येते आणि तिच्यावर चिखल उडवणारच इतक्यात…

  तरुणी लगेच आपलं डोकं चालवते. ती गाडी आपल्या जवळ यायच्या आधीच रस्त्यावरील एक दगड उचलते आणि आपल्या हातात धरून उडवते. तरुणीवर चिखल उडवण्याच्या तयारीत असलेला गाडीचालक घाबरतो आणि तो आपली गाडी थांबवतो त्यानंतर गाडीचा वेग कमी करून अगदी धीम्या गतीने रस्त्यावरून पुढे सरकतो. शिस्तीत तो तरुणीवर बिलकुल चिखल न उडवता आपल्या मार्गाने जातो.

  काय मग आवडली का तुम्हाला ही सोपी ट्रिक. त्यामुळे चिखल उडवत गाडी भुर्रकन गेल्यावक त्या गाडीचालकावर राग काढण्यापेक्षा तिथंच गाडीचालकाला वठणीवर आणणं चागलंच नाही का? त्यामुळे यापुढे हा उपाय करण्यास हरकत नाही.

  to avoid splashing mud by the car woman doing jugaad on road funny video viral