राज्यात १२,५०० पोलिसांची भरती करणार; गृहमंत्र्यांनी पुन्हा मोठी घोषणा केली पण…

मनसुख हिरेन आणि अँटेलिया स्फोटक सापडल्याप्रकरणी पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर पोलिस खात्यातील घडामोडींना वेग आला. राज्यातील पोलीस विभागात मोठे फेरबदल करण्यात आलेत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीनंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यात नवी पोलिस भरती करण्याची घोषणा केलेय.

    मुंबई : राज्यात १२,५०० पोलिसांची भरती करणार असल्याची घोषणा गृहमंत्री अनिल देखमुख यांनी केली आहे. यापूर्वी देखील त्यांनी अशा प्रकारची घोषणा केली. आता पुन्हा एकदा त्यांनी अशीच घोषणा केली आहे. गृहमंत्री फक्त भरतीची घोषणा करत आहेत. प्रत्यक्षात मात्र, भरतीची तारीख जाहीर होत नसल्याने पोलिस भरतीसाठी प्रयत्न करणारे उमेद्वार नाराज झाले आहेत.

    मनसुख हिरेन आणि अँटेलिया स्फोटक सापडल्याप्रकरणी पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर पोलिस खात्यातील घडामोडींना वेग आला. राज्यातील पोलीस विभागात मोठे फेरबदल करण्यात आलेत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीनंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यात नवी पोलिस भरती करण्याची घोषणा केलेय.

    राज्यात पहिल्यांदाच १२५०० पोलीस भरतीचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. कोरोनाचा पोलिस भरतीवर परिणाम झाला आहे. पहिल्या टप्प्यात ५३०० पोलिसांच्या भरती प्रक्रिया सुरू झाली. पहिल्यांदा राज्याची आर्थिक परिस्थिती खराब असताना १२५०० पोलिसांना सेवेत घेण्याचा अतिशय मोठा निर्णय घेण्यात आल्याचंही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अधोरेखित केले.