sandeep deshpande

मुंबई : (Mumbai) मनसे (MNS) सरचिटणीस संदीप देशपांडे (sandeep deshpande) यांना रेल्वे पोलिसांकडून (railway police) नोटीस (notice) पाठवण्यात आली आहे. रेल्वे सुरु व्हावी (to statrt local trains) या मागणीसाठी सोमवारी मनसे सविनय कायदेभंग आंदोलन (Civil disobedience movement) करणार आहे. रेल्वे पोलिसांकडून आंदोलन न करण्याची नोटीसद्वारे सूचना देण्यात आली आहे. आंदोलन केल्यास नियमानुसार कारवाई करणार असल्याचे रेल्वे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. मात्र रेल्वे पोलिसांची नोटीस आली असली तरी सोमवारी आंदोलन होणार असल्याचं संदीप देशपांडे यांनी सांगितलं आहे.

रेल्वे पोलिसांनी कारवाईचा इशारा देऊनही मनसे आपल्या निर्णयावर ठाम आहे. कायदेशीर कारवाईला आम्ही तयार असल्याचं संदीप देशपांडे यांनी म्हटलंय. शिवसेनेची आंदोलन झाली, त्यांना नोटीसा नाही, मात्र आम्हाला लगेच नोटीस देण्यात आली ही दडपशाही असल्याचंही ते म्हणाले.

आठ तास ड्युटी आणि आठ तास प्रवास असे लोकांचे हाल सुरु आहेत हे मुख्यमंत्र्यांना दिसत नाही का? अनिल परब एसटी १०० टक्के चालू करत आहेत. कोरोनाने अनिल परब यांच्या कानात सांगितलं आहे का की, एसटी सुरु झाल्यास कोरोना होणार नाही आणि रेल्वे सुरु झाल्यास होणार, असा खोचक सवालही त्यांनी केला आहे.

मनसेकडून रेल्वे सेवा सुरु करण्यासाठी, सरकारला वारंवार विनंती करण्यात आली आहे. मात्र सरकार अद्यापही रेल्वे सुरु करण्यास तयार नाही. त्यामुळे कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदालापूर, पालघरपासून येणाऱ्या अनेक लोकांचे प्रचंड हाल होत आहेत. विनंती करुनही सरकार ऐकत नसल्याने सोमवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून सविनय कायदेभंग करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सोमवारी जनतेच्या हितासाठी मनसे रेल्वेतून प्रवास करणार असल्याचे संदीप देशपांडे यांनी सांगितले आहे.

लॉकडाऊन काळात रेल्वे सेवा केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच सुरु आहे. इतर लोकांना बसने प्रवास करावा लागतो आहे. बस प्रवासात लोकांची मोठी गर्दी होत आहे. चाकरमान्यांना बसमधून प्रवास करण्यासाठी २-२ तास रांगेत उभे राहावे लागत आहे. त्यामुळे अनेकांचे मोठे हाल होत आहेत. यापूर्वी मनसेकडून मुख्यमंत्र्यांना रेल्वे सुरु करण्यासाठी पत्रही पाठवण्यात आलं होतं. अनेकदा मनसेने रेल्वे सुरु करण्याची मागणी सरकारकडे केली आहे.