Rahul Gandhi यांना काँग्रेसचे नेतृत्व करण्यापासून रोखणे म्हणजे पक्ष संपवणे : संजय राऊत

राहुल गांधी यांना काँग्रेसचे नेतृत्व करण्यापासून रोखणे म्हणजेच देशातील सर्वात जुन्या पक्षाचे अस्तित्व नष्ट करणे हे यावरून सिद्ध होते असा घणाघाती प्रहार शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

मुंबई : राहुल गांधी (rahul gandhi) यांना काँग्रेसचे (congress) नेतृत्व (leadership) करण्यापासून रोखणे म्हणजेच देशातील सर्वात जुन्या पक्षाचे अस्तित्व नष्ट करणे हे यावरून सिद्ध होते असा घणाघाती प्रहार शिवसेना (shivsena) खासदार(mp) संजय राऊत (sanjay raut) यांनी केला आहे. रविवारी सामना(saamana)तील आपले साप्ताहिक सदर ‘रोखठोक’ (rokthok) मध्ये त्यांनी असा उल्लेख केला आहे की, पंतप्रधान मोदी (pm narendra modi) यांच्यासमोर घट्ट पाय रोवून उभा राहील अशा नेत्याची काँग्रेसमध्ये वानवा आहे. सोनिया गांधी यांना २३ काँग्रेस नेत्यांनी लिहिलेल्या पत्राचा संदर्भ घेत पूर्णवेळ सक्षम नेतृत्व करण्यासाठी या नेत्यांना कोणी रोखलं आहे असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

राहुल गांधी यांना नेतृत्व करण्यापासून रोखणे म्हणजे पक्षाचे अस्तित्व नष्ट करणे हे यावरून सिद्ध होते असं त्यांनी म्हटलं आहे. एखादा गांधी घराण्याबाहेरील व्यक्ती काँग्रेसचा अध्यक्ष होणे हा विचार चांगलाच आहे पण या २३ पैकी कोणाकडेही ती क्षमता नाही असा टोलाही त्यांनी लगावला आहे. राऊत यांचा पक्ष शिवसेना महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत सत्तेत आहे. राऊत यांनी माजी काँग्रेस नेत्यांद्वारे स्थापन केलेल्या स्थानिक पक्षांचा उल्लेख करत असेही म्हटले आहे की, “काँग्रेस अद्यापही संपूर्ण देशात आपले अस्तित्व टिकवून आहे फक्त मूळ चेहऱ्यावरील मुखवटे बदलले आहेत. हे मुखवटे काढून टाकून दिले तर पक्ष देशात एक भक्कम पक्ष म्हणून नावारुपाला येईल.” काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिवगंत व्ही एन गाडगीळ यांनी काँग्रेसला कधीही न संपणारी एक वृद्धा असं म्हटलं होतं याचंही त्यांनी यावेळी स्मरण करून दिलं आहे. या वृद्धेचं काय करायचं? हे राहुल गांधी यांनाच ठरवायचं आहे असंही त्यांनी नमूद केलं आहे. (एजन्सी)