कृषी विषय पाठ्यपुस्तकात शिकवणार; सरकारच्या निर्णयावर जयंत पाटील यांची प्रतिक्रिया

कृषी विषय पाठ्यपुस्तकात शिकवला जाणार आहे. सरकारच्या या निर्णयाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी स्वागत केले आहे. पक्षाच्या स्थापनेपासूनच शेती आणि मातीसाठी राष्ट्रवादीचे काम करत असल्याचे ते म्हणाले.

    मुंबई : कृषी विषय पाठ्यपुस्तकात शिकवला जाणार आहे. सरकारच्या या निर्णयाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी स्वागत केले आहे. पक्षाच्या स्थापनेपासूनच शेती आणि मातीसाठी राष्ट्रवादीचे काम करत असल्याचे ते म्हणाले.

    व्यवसाय आधारित शिक्षण या धर्तीवर कृषी आणि कृषीविषयक घटकांचा समावेश शालेय अभ्यासक्रमात करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभाग आणि कृषी विभागाने संयुक्तरीत्या घेतला आहे म्हणून या निर्णयाचे जयंत पाटील यांनी ट्विट करत स्वागत केले आहे.

    कृषी या विषयाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद आणि महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद यांनी संयुक्तपणे अभ्यासक्रम तयार करावा असा निर्णय आज शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड आणि कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.