आज राज्यात २८,६९९ नवीन रुग्णांचे निदान; मुंबईत दिवसभरात ३५१४ कोरोना रुग्ण

राज्यात मंगळवारी २८,६९९ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २५,३३,०२६ झाली आहे. आज १३,१६५ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण २२,४७,४९५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८८.७३ % एवढे झाले आहे.

    मुंबई (Mumbai).  राज्यात मंगळवारी २८,६९९ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २५,३३,०२६ झाली आहे. आज १३,१६५ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण २२,४७,४९५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८८.७३ % एवढे झाले आहे. राज्यात आज एकूण २,३०,६४१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

    दरम्यान राज्यात आज १३२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. आज नोंद झालेल्या एकूण १३२ मृत्यूंपैकी ७४ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २३ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ३५ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ३५ मृत्यू पुणे-११, ठाणे-११, नाशिक-९, औरंगाबाद-२, सातारा -१ आणि नंदूरबार -१ असे आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ % एवढा आहे.

    आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,८५,८४,४६३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २५,३३,०२६ (१३.६३ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ११,७७,२६५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ११,८८७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

    मुंबईत दिवसभरात ३५१४ कोरोनाचे रुग्ण 
    दरम्यान मुंबईत दिवसभरात ३५१४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून आता पर्यंत बाधित रुग्णांची संख्या ३६९४५१ एवढी झाली आहे. तर आज ८ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आले. आता पर्यंत ११६०४ मृत्यूची नोंद करण्यात आली.