‘आज आहे माझा सुदिन; कारण मी घेतले आहे कोवॅक्सिन’, रामदास आठवलेंनी घेतली कोविडची लस

जीवन जगायची ओळखा नस; घ्या सर्वांनी कोविड प्रतिबंधक लस आज आहे माझा सुदिन; कारण मी घेतले आहे कोवॅक्सिन असे काव्य करीत कोविड लस बाबत कोणतीही शंका न बाळगता न घाबरता सर्वांनी कोविड प्रतिबंधक लस घ्यावी, असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

    मुंबई (Mumbai).  जीवन जगायची ओळखा नस; घ्या सर्वांनी कोविड प्रतिबंधक लस आज आहे माझा सुदिन; कारण मी घेतले आहे कोवॅक्सिन असे काव्य करीत कोविड लस बाबत कोणतीही शंका न बाळगता न घाबरता सर्वांनी कोविड प्रतिबंधक लस घ्यावी, असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. आठवले यांनी आज पत्नी सीमा आठवले यांच्यासह जे. जे. रुग्णालयात कोवॅक्सीनचा पहिला डोस घेतला.

    महाराष्ट्रात सध्या कोरोना चा प्रादुर्भाव वाढत आहे.देशात एकूण कोरोना रुग्णांपैकी एकट्या महाराष्ट्रात 70 टक्के रुग्णसंख्या वाढत आहे.महाराष्ट्रात कोरोना चा प्रसार वाढणे ही चांगली बाब नाही तर चिंतेची बाब आहे. राज्यात मोठे सार्वजनिक कार्यक्रम गर्दी चे कार्यक्रम बंद करावेत.सर्वांनी सुरक्षित अंतर ठेवावे; मास्क वापरावा; सॅनिटाईझर चा वापर करावा कोरोना चा प्रसार रोखण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करावेत असे आवाहन ना. रामदास आठवले यांनी केले.

    ‘गो कोरोना गो’चा दिला होता नारा
    रामदास आठवले नेहमी आपल्या वेगळ्या शैलीने लोकांवर वेगळी छाप टाकतात. कोरोना भारतात दाखल झाल्यावर रामदास आठवले यांनी हातात फलक आणि मेणबत्त्या घेऊन गो कोरोना गो असा नारा दिला होता. त्यांचा हा नारा सोशल मीडियावर धुमाकूळ घालत होता. त्यावर अनेक मिम्सही बनले. काहींनी गाणी बनवली. त्या गो कोरोना गो चा नारा देणाऱ्या रामदास आठवले यांनी कोविड प्रतिबंधक लस घेतल्यानंतर एक भन्नाट कविताही केली आता काही दिवस ही कविता सोशल मीडियावर धुमाकूळ घालेल या शंका नाही.