महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज (मंगळवार) १५ वा वर्धापन दिन आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनसेनं आजचा वर्धापन दिन सोहळा रद्द केला आहे. तसेच वर्धापन दिनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भल्या पहाटे कार्यकर्त्यांसाठी ट्विट करून त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

    मुंबईः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज (मंगळवार) १५ वा वर्धापन दिन आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनसेनं आजचा वर्धापन दिन सोहळा रद्द केला आहे. तसेच वर्धापन दिनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भल्या पहाटे कार्यकर्त्यांसाठी ट्विट करून त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. ट्विटमध्ये राज ठाकरे यांनी लिहिलं की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील माझ्या सर्व सहकाऱ्यांना वर्धापन दिनाच्या मनापासून शुभेच्छा. या ट्विटमध्ये त्यांनी #मनसेवर्धापनदिन #महाराष्ट्रधर्म #हिंदवीस्वराज्य #महाराष्ट्रप्रथम #राजठाकरे #महाराष्ट्रसैनिक अशा टॅगचाही वापर केला आहे.

    या ट्विटसोबत त्यांनी एक फोटोही शेअर केला आहे. शेअर केलेल्या फोटोत किल्ल्याचं बुरुज असून त्याला फुलांच्या रंगेबेरंगी माळांनी सजवण्यात आलं आहे. नुकताच होणारा सूर्यादय आणि आकाशात उंच भरारी घेणारा एक पक्षी दिसत आहे.

    मनसेचा वर्धापन दिन सोहळा रद्द

    दरवर्षी मनसेचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दादरच्या शिवाजी पार्कमध्ये वर्धापनदिनानिमित जय्यत तयारी करण्यात येते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी होते. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘मनसे’चा वर्धापन दिन सोहळा रद्द करण्यात आला आहे. गेल्यावर्षी वर्धापन दिन सोहळा हा नवी मुंबईत आयोजित करण्यात आला होता. यावेळी पक्षाचे शॅडो कॅबिनेट जाहीर करण्यात आले होते.