आज परमवीर यांची चौकशी, नगराळेंच्या अहवालाने अडचणीत वाढ

तत्कालीन पोलीस सह आयुक्त (गुन्हे) यांचा सचिन वाझे यांच्या‌ नियुक्तीला विरोध असतानाही परमबीर सिंग यांनी त्यांची नियुक्ती केली, असा खुलासा अहवालात करण्यात आला आहे. वाझे सर्वसाधारण पोलीस निरीक्षक असतानाही ते थेट परमबीर सिंग यांना रिपोर्ट करायचे. विविध हायप्रोफाईल प्रकरणांचा तपास परमबीर सिंग यांच्या सांगण्यानुसार वाझेंकडे‌ देण्यात आला होता, असंही अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

    मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) कार्यालयात दाखल झाले आहेत. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेलं वाहन तसंच मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एनआयएकडून केला जात आहे. याचप्रकरणी परमबीर सिंह एनआयए कार्यालयात दाखल झाले आहेत. एनआयएकडून त्यांचा जबाब नोंदवला जाणार आहे.

    नगराळे यांच्या अहवालाने अडचणीत वाढ

    मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी गृह खात्याला पाठवलेल्या अहवालामुळे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग अडचणीत येण्याची शक्यता आहे. अहवालात सचिन वाझे यांची पुनर्नियुक्ती परमबीर सिंग यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत करण्यात आली होती. तत्कालीन पोलीस सह आयुक्त (गुन्हे) यांचा सचिन वाझे यांच्या‌ नियुक्तीला विरोध असतानाही परमबीर सिंग यांनी त्यांची नियुक्ती केली, असा खुलासा अहवालात करण्यात आला आहे. वाझे सर्वसाधारण पोलीस निरीक्षक असतानाही ते थेट परमबीर सिंग यांना रिपोर्ट करायचे. विविध हायप्रोफाईल प्रकरणांचा तपास परमबीर सिंग यांच्या सांगण्यानुसार वाझेंकडे‌ देण्यात आला होता, असंही अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

    दरम्यान, सचिन वाझे यांच्या अटकेनंतर एनआयएने गुन्हे शाखेचे सात अधिकारी, अंमलदारांची चौकशी केली आहे. त्यात एक सहायक आयुक्त, एक निरीक्षक, दोन सहायक निरीक्षक आणि तीन अमलदारांचा समावेश आहे.