MegaBlock

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ९.५३ पासून दुपारी २.४८ वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद / अर्ध जलद सेवा मुलुंड ते कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. या सेवा त्यांच्या निर्धारित थांब्यांवर थांबतील व वेळापत्रकापेक्षा १० मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.

  मुंबई : मध्य रेल्वेतर्फे मुंबई विभागात आपल्या उपनगरी भागांवर अभियांत्रिकी व देखभाल विविध कामे करण्यासाठी आज मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

  मेन मार्ग (Main Line)

  ठाणे- कल्याण अप व डाउन जलद मार्गावर सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० या वेळेत

  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ९.५३ पासून दुपारी २.४८ वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद / अर्ध जलद सेवा मुलुंड ते कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. या सेवा त्यांच्या निर्धारित थांब्यांवर थांबतील व वेळापत्रकापेक्षा १० मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.

  कल्याण येथून सकाळी १०.२६ ते दुपारी ३.१९ दरम्यान सुटणारी अप-जलद / अर्ध जलद सेवा कल्याण व मुलुंड स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळविण्यात येतील व त्यांच्या ठरलेल्या थांब्यांनुसार थांबविण्यात येतील. या गाड्या पुन्हा मुलुंड स्थानकात अप जलद मार्गावर वळविण्यात येतील व वेळापत्रकापेक्षा १० मिनिटे उशिराने गंतव्य स्थानी पोहोचतील.

  हार्बर मार्ग (Harbour Line)

  पनवेल-वाशी अप व डीएन हार्बर मार्ग सकाळी ११.०५ ते संध्याकाळी ०४.०५ दरम्यान (बेलापूर / नेरुळ-खारकोपर विभागासह)

  अप हार्बर पनवेल / बेलापूर येथून सकाळी १०.४९ ते दुपारी ४.०१ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करिता सुटणारी आणि डाऊन हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.०३ ते दुपारी ३.१६ दरम्यान बेलापूर / पनवेल करिता सुटणाऱ्या सेवा रद्द राहतील.

  ट्रान्स हार्बर मार्ग (Trans Harbour Line)

  अप ट्रान्स हार्बर मार्गावर पनवेलहून सकाळी ९.०१ ते सायंकाळी ३.५३ या वेळेत ठाण्याकडे जाणाऱ्या आणि डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे येथून सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० दरम्यान पनवेल करिता सुटणाऱ्या सेवा रद्द करण्यात येणार आहेत.

  अप बीएसयू मार्गावर खारकोपर येथून सकाळी १०.४५ ते संध्याकाळी ४.०० दरम्यान नेरूळ / बेलापूर करिता सुटणाऱ्या सेवा आणि डाऊन बीएसयू मार्गावर नेरूळ / बेलापूर येथून सकाळी १०.१५ ते दुपारी ३.३२ या वेळेत खारकोपरसाठी सुटणार्‍या सेवा रद्द रहातील.

  ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -वाशी विभागात विशेष गाड्या चालविल्या जातील.

  ब्लॉकच्या कालावधीत ट्रान्सहार्बर मार्गावर ठाणे-वाशी / नेरूळ स्थानकांदरम्यान सेवा उपलब्ध असेल.

  पश्चिम मार्ग (Western Line)

  बोरीवली ते गोरेगाव अप जलद मार्गावर आज रात्री ११ ते ३ दरम्यान ब्लॉक असेल. या ब्लॉक कालावधीत बोरीवली ते गोरेगाव अप जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. पश्चिम रेल्वेवर आज कोणताही दिवसकालीन ब्लॉक घेण्यात येणार नाही.