Tomorrow and day after tomorrow Parel Naigaon area has no water supply from bmc
उद्या, परवा, परळ, नायगावमध्ये पाणी नाही

  • १०० वर्षांपूर्वीची व सुमारे ४ किमी लांबीची जलवाहिनी बदलविण्‍याचे काम अंतिम टप्‍प्‍यात
  • दि.११ व १२ सप्‍टेंबर रोजी परळ, शिवडी, नायगांव आदी परिसरातील पाणीपुरवठा बंद
  • संबंधित परिसरातील नागरिकांना पाणी काटकसरीने वापरण्‍याचे आवाहन

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका (bmc) क्षेत्रात काही ठिकाणी जुन्‍या जलवाहिन्‍या (water pipe lines) आहेत. यापैकी जीर्ण झालेल्‍या जलवाहिन्‍यांची अनेकदा दुरस्‍ती करावी लागते. या अनुषंगाने बृहन्‍मुंबई महानगरपालिका (bmc) क्षेत्रातील जुन्‍या व जीर्ण झालेल्‍या जलवाहिन्‍या बृहन्‍मुंबई महानगरपालिकाद्वारे टप्‍प्‍या-टप्‍प्‍याने बदलविण्‍यात येत आहेत.

याच श्रृंखले अंतर्गत आता ‘एफ दक्ष‍िण’ व ‘ई’ या दोन विभागातून जाणारी सुमारे ४ किमी लांबीची जलवाहिनी बदलविण्‍याचे काम आता अंतिम टप्‍प्‍यात आहे. या अंतर्गत जकेरीया बंदर मार्गाखाली असलेली १४५० मि.मी व्यासाची जलवाहिनी निष्कासित करुन त्‍या ऐवजी नवीन १५०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी कार्यान्वित करण्‍याचे काम करण्‍यात येणार आहे.

ही जलवाहिनी सुमारे १०० वर्षांपूर्वीची आहे. त्‍याचबरोबर ‘एफ दक्षिण’ विभागातील पाणी पुरवठा सुव्यवस्थित करण्याकरिता शिवडी येथील बस डेपो जवळ ६०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीची जोडणी ही १५०० मि.मी. व्यासाच्या नवीन जलवाहिनीला करण्‍याचे काम देखील करण्‍यात येणार आहे. ही कामे शुक्रवार दिनांक ११.०९.२०२० रोजी सकाळी १०:०० वाजल्यापासून ते शनिवार दिनांक १२.०९.२०२० रोजी सकाळी १०:०० वाजेपर्यंत एकूण २४ तासांसाठी हाती घेण्यात येणार आहेत.

या कामांमुळे सदर जलवाहिनींशी संबंधित असणाऱ्या प्रामुख्‍याने परळ, शिवडी, नायगांव, घोडपदेव आदी परिसरातील काही ठिकाणचा पाणीपुरवठा हा २४ तासांपर्यंत किंवा काही तासांसाठी पूर्णत: बंद राहणार आहे. तसेच सदर कालावधी दरम्‍यान दादर, हिंदमाता, लालबाग इत्‍यादी परिसरांना कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. तरी या संबंधित परिसरातील नागरिकांना खबरदारीची उपयोजना म्‍हणून अगोदरच्‍या दिवशीच पाण्‍याचा पुरेसा साठा करुन ठेवावा आणि पाणी काटकसरीने वापरुन बृहनमुंबई महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्‍या जलअभियंता खात्‍याद्वारे करण्‍यात आले आहे.

वरीलप्रमाणे पाणीपुरवठा पूर्णत: किंवा अंशत: बंद राहणा-या परिसरांची नावे व संबंधित तपशिल पुढीलप्रमाणे आहे:

पाणी पुरवठा बंद असणाऱ्या परिसरांचा तपशील

१. हॉस्पिटल प्रभाग
२४ तास पाणीपुरवठा बंद
(दि. ११.०९.२०२० रोजी सकाळी १०.०० ते दि. १२.०९.२०२० रोजी सकाळी १०.०० पर्यंत)
के.ई.एम. हॉस्पिटल, टाटा हॉस्पिटल, बाई जेरबाई वाडिया हॉस्पिटल आणि एमजीएम हॉस्पिटल

२. शिवडी (पूर्व)
(दि. ११.०९.२०२० रोजी रात्री ७.०० ते रात्री ९.३० पर्यंत)
शिवडी फोर्ट रोड, गाडी अड्डा शिवडी कोळी वाडा

३. शिवडी (पश्चिम)
(दि. ११.०९.२०२० रोजी संध्याकाळी ४.३० ते संध्याकाळी ७.०० पर्यंत)
आचार्य दोंदे मार्ग, टि.जे.रोड, झकेरीया बंदर रोड, शिवडी क्रॉस रोड

४. गोलंजी हिल पाणी पुरवठा
अ) परेल गांव
(दि. ११.०९.२०२० रोजी दुपारी १.४५ ते दुपारी ०४.४५ पर्यंत) गं.द. आंबेकर मार्ग ५० टेनामेंटपर्यंत, एकनाथ घाडी मार्ग, परेल व्हिलेज रोड, नानाभाई परळकर मार्ग, भगवंतराव परळकर मार्ग, विजयकुमार वांळिभे मार्ग, एस.पी. कंपाऊंड

ब)काळेवाडी
(दि. ११.०९.२०२० रोजी रात्री ८.३० ते रात्री ११.३० पर्यंत) परशुराम नगर, जिजामाता नगर, आंबेवाडी(भाग) साईबाबा रोड,मिंट कॉलोनी, राम टेकडी

क) नायगांव
(दि.१२.०९.२०२० रोजी सकाळी ७.०० ते सकाळी १०.०० पर्यंत)
जेरबाई वाडिया मार्ग, स्पिंग मिल चाळ, ग.द. आंबेकर मार्ग,गोविंदजी केणी मार्ग, शेटये मार्केट, भोईवाडा गांव, हाफकिन

५. अभ्युदय नगर (दि. १२.०९.२०२० रोजी सकाळी २.१५ ते सकाळी ६.०० पर्यंत) अभ्युदय नगर, ठोकरसी जीवराज मार्ग

६. ई विभाग दि. ११.०९.२०२० रोजी सायंकाळी ०६.४५ ते सायंकाळी ०९.००) ई विभाग, म्हाडा इमारत, फेरबंदर नाका, राणीचा बाग परिसर, घोडपदेव नाका.

खालील परिसरांना कमी दाबाने पाणीपुरवठा होईल

७. शहर उत्तर पाणी पुरवठा

(दि. १२.०९.२०२० रोजी सकाळी ७.०० ते सकाळी १०.०० पर्यंत) दादर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, जगन्नाथ भातणकर मार्ग, बी. जे. देवरुखकर मार्ग, गोविंदजी केणी मार्ग, हिंदमाता.

८. शहर दक्षिण पाणी पुरवठा

(दि. १२.०९.२०२० रोजी सकाळी ४.०० ते सकाळी ७.०० पर्यंत) लालबाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, डॉ. एस. एस. राव रोड, दत्ताराम लाड मार्ग, जिजीभॉय लेन, महादेव पालव मार्ग, साने गुरुजी मार्ग, गॅस कंपनी लेन

९. ई विभाग दि. ११.०९.२०२० रोजी सायंकाळी ०६.४५ ते सायंकाळी ०९.००) रामभाऊ रोड, ए.जी. पवार लेन, बॅ. नाथ पै मार्ग, संत सांवता मार्ग, घोडपदेव, डि.पी.वाडी, लवलेन, चापसी भिमजी मार्ग, संत सांवता मार्ग, (हसीना हॉस्पीटल, आंबेडकर मार्ग, टि.बी. कदम मार्ग, ई.एस.पतंगवाला मार्ग, वीर तानाजी मालुसरे मार्ग, हरिबा अर्जुन पालव मार्ग, दादाजी कोंडदेव मार्ग

तरी, नागरिकांना पुन्‍हा एकदा विनंती करण्यात येत आहे की, त्यांनी अगोदरच्या दिवशीच खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा पुरेसा साठा करावा व पाणी काटकसरीने वापरुन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनास योग्य ते सहकार्य करावे.