मध्य रेल्वेच्या दोन्ही मार्गांवरआज मेगाब्लॉक

सकाळी १०.४६ ते दुपारी ३.२६ या वेळेत ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद सेवा मुलुंड येथे अप धीम्या मार्गावर वळविण्यात येतील आणि मुलुंड ते दादर स्थानकांदरम्यानच्या सर्व स्थानकांवर थांबतील आणि आपल्या नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिरा गंतव्यस्थानी पोहोचतील.

मुंबई : देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी आज रविवारी (१७ जानेवारी) रोजी मध्य रेल्वेच्या दोन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्याचे निश्चित केले आहे.

मध्य रेल्वे मेन लाइन मार्ग (Central Railway Main Line)

माटुंगा – मुलुंड अप व डाऊन जलद मार्ग सकाळी ११.०० ते दुपारी ४.०० पर्यंत

सकाळी १०.२५ ते दुपारी ३.२१ या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सुटणाऱ्या डाऊन जलद सेवा माटुंगा येथे डाऊन धीम्या मार्गावर वळविल्या जातील आणि सायन व मुलुंड दरम्यानच्या सर्व स्थानकांवर थांबतील तसेच त्या आपल्या नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिरा गंतव्यस्थानी पोहोचतील. ठाण्यापुढील जलद गाड्या मुलुंड येथे डाऊन जलद मार्गावर पुन्हा वळविण्यात येणार आहेत.

सकाळी १०.४६ ते दुपारी ३.२६ या वेळेत ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद सेवा मुलुंड येथे अप धीम्या मार्गावर वळविण्यात येतील आणि मुलुंड ते दादर स्थानकांदरम्यानच्या सर्व स्थानकांवर थांबतील आणि आपल्या नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिरा गंतव्यस्थानी पोहोचतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप जलद सेवा परळ येथे पुन्हा अप जलद मार्गावर वळविण्यात येतील.

मध्य रेल्वे हार्बर लाइन मार्ग (Central Railway Harbour Line)

कुर्ला – वाशी अप व डाऊन हार्बर मार्ग सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत

सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३९ या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून वाशी / बेलापूर / पनवेलसाठी सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी पनवेल /बेलापूर /वाशी येथून सकाळी १०.२१ ते दुपारी ३.४१ या दरम्यान सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

तथापि, ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कुर्ला आणि वाशी – पनवेल विभागा दरम्यान विशेष सेवा चालविण्यात येणार आहेत. ब्लॉकच्या कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १०.०० ते दुपारी ४.३० दरम्यान मेन लाइन आणि ट्रान्स-हार्बर मार्गावरुन प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.