पश्चिम रेल्वेवर बोरिवली-अंधेरी स्थानकांदरम्यान आज रात्रकालीन जम्बो ब्लॉक

ब्लॉक कालावधीत अप धीम्या मार्गावरील (up slow) सर्व लोकलगाड्या बोरिवली ते अंधेरी (Borivali to Andheri) स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर (up fast) तसेच डाऊन धीम्या मार्गावरील (down slow) सर्व लोकल्स सांताक्रुझ आणि बोरिवलीपर्यंत डाऊन जलद मार्गांवर चालविण्यात येतील. ब्लॉक दरम्यान धीम्या मार्गावरील लोकल ट्रेन्सना विलेपार्ले स्थानकात दोनदा थांबा देण्यात येईल तसेच अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील सर्व लोकल्स राम मंदिर स्थानकावर थांबणार नाहीत.

    मुंबई : रेल्वे ट्रॅक, सिग्नल यंत्रणा आणि देखभाल-दुरूस्तीच्या कामांसाठी पश्चिम रेल्वेच्या अंधेरी आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान शनिवारी-रविवारी (मध्यरात्री) रात्री १२ वाजल्यापासून ते पहाटे ४ वाजेपर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गावर रात्रकालीन जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे.

    ब्लॉक कालावधीत अप धीम्या मार्गावरील सर्व लोकलगाड्या बोरिवली ते अंधेरी स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर तसेच डाऊन धीम्या मार्गावरील सर्व लोकल्स सांताक्रुझ आणि बोरिवलीपर्यंत डाऊन जलद मार्गांवर चालविण्यात येतील. ब्लॉक दरम्यान धीम्या मार्गावरील लोकल ट्रेन्सना विलेपार्ले स्थानकात दोनदा थांबा देण्यात येईल तसेच अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील सर्व लोकल्स राम मंदिर स्थानकावर थांबणार नाहीत.

    ब्लॉक कालावधी दरम्यान बोरिवली स्थानकातील फलाट क्र१,२,३, आणि ४ वरून कोणत्याही लोकल्स सुटणार नाहीत. रविवारी दिवसभरात पश्चिम रेल्वेवर कोणताही ब्लॉक घेण्यात येणार नाही असे पश्चिम रेल्वेने प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

    Tonights jumbo block between Borivali Andheri stations on the Western Railway