मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस; ‘या’ ठिकाणी दिला ऑरेंज अर्लट

येत्या तीन ते चार दिवसात महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर वेगाने वारे वाहतील. तसेच राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो असा, अंदाज वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र आज तीव्र झाले आहे.

    मुंबई: मुंबई, ठाण्यात पावसाने जोर धरला असून रविवारी दमदार बरसला. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. येत्या २४ तासांत हे कमी दाबाचे क्षेत्र आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई ठाण्यात सोमवार व मंगळवारी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

    मागील काही दिवसांपासून मुंबईसह राज्याच्या काही भागात समाधानकारक पाऊस कोसळतो आहे. रविवारी मुंबई, ठाणे, नवीमुंबईत सकाळपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे.

    आयएमडीनं महाराष्ट्रात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला ऑरेंज अ‌लर्ट दिला आहे. तर, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांना यलो अलर्ट देत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. नागरिकांनी सतर्क राहावे, असं देखील सांगण्याचत करण्यात आले आहे.

    पावसाचा जोर वाढणार असून पुढील दोन दिवस मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केली आहे. सोमवारी व मंगळवारी या दोन दिवसांत मुंबईसह ठाणे, पालघऱ येथे यलो अलर्ट देण्यात आला आहे.

    येत्या तीन ते चार दिवसात महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर वेगाने वारे वाहतील. तसेच राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो असा, अंदाज वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र आज तीव्र झाले आहे. प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्यावतीनं हवामानाचा अंदाज जारी करण्यात आला आहे. तर, पुढील चार ते पाच दिवसांसाठी विविध जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अ‌ॅलर्ट जारी करण्यात आले आहेत. हवामानतज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे.