आज मध्यरात्री मध्य रेल्वेतर्फे कल्याण-कसारा विभागात ट्राफिक व पॉवर ब्लॉक

खडवली आणि वासिंद स्थानकांदरम्यान लेव्हल क्रॉसिंग क्रमांक ६१ येथे ०२.१५ पासून ०७.१५ पर्यंत आर.एच. गर्डर बसविण्यासाठी आसनगाव व आटगाव स्थानकांदरम्यान लेव्हल क्रॉसिंग क्रमांक ६८ येथे ०२.२५ पासून ०७.२५ पर्यंत आर.एच. गर्डर बसविण्यासाठी शहाड स्थानकावर ०२.०० पासून ०४.३० पर्यंत रोड क्रेनद्वारे पादचारी पुलाचे गर्डर बसविण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

  मुंबई : मध्य रेल्वे दिनांक १४.३.२०२१ रोजी ०२.०० वाजल्यापासून ०७.२५ वाजेपर्यंत ( दिनांक १३/१४.३.२०२१ मधील मध्यरात्री) कल्याण-कसारा विभागातील अप व डाऊन मार्गावर तीन ठिकाणी ट्राफिक व पॉवर ब्लॉक घेणार आहे. तपशील खालीलप्रमाणे:

  खडवली आणि वासिंद स्थानकांदरम्यान लेव्हल क्रॉसिंग क्रमांक ६१ येथे ०२.१५ पासून ०७.१५ पर्यंत आर.एच. गर्डर बसविण्यासाठी
  आसनगाव व आटगाव स्थानकांदरम्यान लेव्हल क्रॉसिंग क्रमांक ६८ येथे ०२.२५ पासून ०७.२५ पर्यंत आर.एच. गर्डर बसविण्यासाठी
  शहाड स्थानकावर ०२.०० पासून ०४.३० पर्यंत रोड क्रेनद्वारे पादचारी पुलाचे गर्डर बसविण्यासाठी या ब्लॉकमुळे, रेल्वे वाहतूक खालीलप्रमाणे असेल:

  उपनगरी गाड्या

  • टिटवाळा ते कसारा दरम्यानच्या उपनगरी सेवा ब्लॉक कालावधी दरम्यान बंद राहतील.
  • कसारा येथून पहिली लोकल ०६.४५ वाजता सुटेल आणि ब्लॉक पूर्ण होईपर्यंत आटगाव येथे थांबविण्यात येईल.
  • आसनगावहून पहिली लोकल ०७.३५ वाजता सुटेल.
  • टिटवाळा येथून पहिली लोकल ४.३२ वाजता सुटेल.
  • आसनगावसाठी पहिली लोकल कल्याण येथून ०७.३२ वाजता सुटेल
  • कसारासाठी पहिली लोकल कल्याण येथून ०७.५५ वाजता सुटेल.

  रद्द असणाऱ्या विशेष गाड्या

  • 01141 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-आदिलाबाद विशेष दिनांक १२.३.२०२१ रोजी सुटणारी
  • 01142 आदिलाबाद- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई विशेष दिनांक १३.३.२०२१ रोजी सुटणारी
  • 07058 सिकंदराबाद – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई विशेष दिनांक १३.३.२०२१ रोजी सुटणारी
  • 07057 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-सिकंदराबाद विशेष दिनांक १४.३.२०२१ रोजी सुटणारी
  • 07617 हजुर साहिब नांदेड- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई विशेष दिनांक १३.३.२०२१ रोजी सुटणारी
  • 07618 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – हजुर साहिब नांदेड विशेष दिनांक १४.३.२०२१ रोजी सुटणारी
  • 02198 जबलपूर – कोईमतूर विशेष दिनांक १३.३.२०२१ रोजी सुटणारी
  • 02197 कोईमतूर – जबलपूर विशेष दिनांक १५.३.२०२१ रोजी सुटणारी

  मुंबईच्या दिशेने येणाऱ्या विशेष गाड्यांचे नियमन

  खालील विशेष गाड्या इगतपुरी ते कल्याण स्थानकांदरम्यान एक तास ते तीन तास पर्यंत थांबविण्यात येतील आणि नियोजित वेळेपेक्षा उशिराने पोहोचतील.

  • 01237 नागपूर-मडगाव विशेष दिनांक १३.३.२०२१ रोजी सुटणारी
  • 02618 हजरत निजामुद्दीन-एर्नाकुलम विशेष दिनांक १३.३.२०२१ रोजी सुटणारी
  • 02138 फिरोजपूर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई विशेष दिनांक १२.३.२०२१ रोजी सुटणारी
  • 02190 नागपूर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई विशेष दिनांक १३.३.२०२१ रोजी सुटणारी

  मुंबईहून सुटणाऱ्या विशेष गाड्यांचे नियमन

  खालील विशेष गाड्या कल्याण व टिटवाळा दरम्यान आणि नीळजे स्थानकांवर थांबविण्यात येतील

  • 02259 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई -हावडा विशेष दिनांक १४.३.२०२१ रोजी सुटणारी
  • 02129 लोकमान्य टिळक टर्मिनस -प्रयागराज विशेष दिनांक १४.३.२०२१ रोजी सुटणारी
  • 05017 लोकमान्य टिळक टर्मिनस -गोरखपूर विशेष दिनांक १४.३.२०२१ रोजी सुटणारी
  • 01236 मडगाव- नागपूर विशेष दिनांक १३.३.२०२१ रोजी सुटणारी

  मुंबईच्या दिशेने येणाऱ्या विशेष गाड्यांचे मार्ग परिवर्तन

  • 02541 गोरखपूर- लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष दिनांक १२.३.२०२१ रोजी सुटणारी गाडी जळगाव-वसई रोड मार्गे वळविण्यात येईल व कल्याणकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी भिवंडी रोड येथे थांबेल.
  • 02810 हावडा- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई विशेष दिनांक १२.३.२०२१ रोजी सुटणारी गाडी जळगाव-वसई रोड मार्गे वळविण्यात येईल आणि कल्याणकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी भिवंडी रोड येथे थांबेल.

  विशेष गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

  • 02112 अमरावती- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई विशेष दिनांक १३.३.२०२१ रोजी सुटणारी गाडी अमरावतीहून ३ तास उशिराने सोडण्यात येईल.
  • 02106 गोंदिया- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई विशेष दिनांक १२.३.२०२१ रोजी सुटणारी गाडी गोंदियाहून ३ तास उशिराने सोडण्यात येईल.

  या पायाभूत सुविधांसाठी घेण्यात येणाऱ्या ब्लॉक मुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे असे मध्य रेल्वेने प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.