सकाळी सकाळी मुंबईकरांचा वेग मंदावला, माटुंगा पुलावरील अपघातामुळे वाहतूक कोंडी

शुक्रवारी सकाळी माटुंग्याजवळ एका खासगी बसला अपघात झाल्यामुळे या मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे सकाळी सकाळीच कामावर जाणाऱ्या मुंबईकरांना मनस्तापाला सामोरं जावं लागलं.

मुंबईहून ठाण्याला जाणाऱ्या प्रवाशांचा सकाळी सकाळीच खोळंबा झाला. मुंबईकडून नवी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर माटुंगा या टिकाणी एक खासगी ट्रॅव्हल बसला अपघात झालाय.

शुक्रवारी सकाळी माटुंग्याजवळ एका खासगी बसला अपघात झाल्यामुळे या मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे सकाळी सकाळीच कामावर जाणाऱ्या मुंबईकरांना मनस्तापाला सामोरं जावं लागलं.

माटुंगा सर्कलजवळ एक ट्रॅव्हल बस दुभाजकाला आपटली आणि दुसऱ्या मार्गिकेत घुसली. त्यामुळे या रस्त्यावरची वाहतूक विस्कळीत झाली. यामुळे या मार्गावरची वाहतूक खोळंबली असून माटुंगा पुलावर वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली.