No entry to buses and other vehicles coming from foreign countries in Mumbai; Passengers will be dropped off at Mulund-Dahisar check post Aditya Thackeray's decision

लॉकडाऊनचे निर्बंध १५ जूनपर्यंत कायम ठेवत कमी रुग्णसंख्या असलेल्या भागात दुकानांच्या वेळात तीन तासांची वाढ करण्याची मुभा देताच, सर्वकाही सुरळीत चालले असल्याचा समज होऊन मुंबईत लोक घराबाहेर पडून लागले आहेत. त्यामुळे रस्त्यावर वाहनांची गर्दी होऊ लागली आहे. बाजारातही गर्दी दिसू लागली आहे. या गर्दीतूनच पुन्हा कोरोना जोर धरण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

    मुंबई : लॉकडाऊनचे निर्बंध १५ जूनपर्यंत कायम ठेवत कमी रुग्णसंख्या असलेल्या भागात दुकानांच्या वेळात तीन तासांची वाढ करण्याची मुभा देताच, सर्वकाही सुरळीत चालले असल्याचा समज होऊन मुंबईत लोक घराबाहेर पडून लागले आहेत. त्यामुळे रस्त्यावर वाहनांची गर्दी होऊ लागली आहे. बाजारातही गर्दी दिसू लागली आहे. या गर्दीतूनच पुन्हा कोरोना जोर धरण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

    लॉकडाऊनचे निर्बंध १५ जूनपर्यंत कायम राहणार असल्याची घोषणा केल्यानंतर सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत होणाऱी गर्दी पाहून आश्चर्य व्यक्त केले आहे. इतकेच नाही तर मुंबईत अशीच गर्दी होत राहिली तर आणखी कडक निर्बंध करणार असल्याचा इशाराच उद्धव ठाकरेंनी दिला आहे. मात्र, त्या इशाऱ्याचा मुंबईकरांवर काहीही परिणाम झालेला दिसत नाही.

    मुंबई किंवा महाराष्ट्रात आपण बंधने उठवलेली नाहीत. अजूनही कोरोनाचा धोका संपलेला नाही. मुंबईकर असेच गाफील राहिले तर संथगतीने सुरु होणाऱ्या आयुष्याला पुन्हा ब्रेक लागण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

    पहिल्या लाटेत दररोज आढळणाऱ्या रुग्णसंख्येत २,८४८ चा विक्रम झाला असताना कडक निर्बंधांमुळे ती रुग्णसंख्या ३५० पर्यंत मर्यादित ठेवण्यात यश आले होते. मात्र नियम पाळण्यात नागरिकांकडून कुचराई झाल्याने दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या ११ हजारांच्या पुढे गेली. या लाटेत मृत्यूचे प्रमाणही वाढले. पहिल्या लाटेपेक्षा ही लाट फार भयंकर होती. त्यामुळे रुग्णांसाठी बेड्स, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन मिळविण्यात फारच अडचणी आल्या. पहिल्या लाटेत कोरोनाविरुद्धच्या लढाईची तयारी काहीच नव्हती.

    मात्र, दुसऱ्या लाटेत तयारी असूनही कमतरता जाणवली. आता तिसरी लाट याहून भयंकर असण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे दुकानांच्या वेळा दुपारी २ वाजेपर्यंत वाढविण्यात आल्या असल्या, तरी कोरोना संपला असा समज कोणी करून घेण्याची गरज नाही. हा समज लोकांच्या अंगलट येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.