Train to depart directly from Dadar for 'Statue of Unity'; Prime Minister Narendra Modi showed the green flag for mega connectivity of railways

मुंबई : ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’कडे पर्यटकांचा ओढा वाढण्यासाठी देशभरातून रेल्वे सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. यातील एक ट्रेन मुंबईच्या दादर रेल्वे स्थानकातून सुटणार आहे. यामुळे ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ पाहण्याची इच्छा असलेल्या पर्यटकांना याचा मोठा फायदा होणार आहे. रेल्वेच्या मेगा कनेक्टिव्हिटीला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हिरवा झेंडा दाखवला.

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आठ आरामदायी रेल्वेंचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शुभारंभ करण्यात आला. दादर, वाराणसी, अहमदाबाद, हजरत निजामुद्दीन, रीवा, चेन्नई आणि प्रतापनगर येथून केवडियासाठी रेल्वेसेवा सुरू करण्यात आल्या आहेत.

देशाच्या विविध भागातून एकाच ठिकाणी एकाच वेळी आठ रेल्वेसेवा सुरू करणे हे ऐतिहासिक आहे. एक भारत, श्रेष्ठ भारतचा मंत्र देणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जगात सर्वांत उंच असलेल्या पुतळ्याचे दर्शन पर्यटकांना घेता येणार आहे. केवडिया रेल्वे कनेक्टिव्हिटीमुळे आदिवासी समाजाचे जीवन बदलण्यास सुरुवात होईल, असे पंतप्रधाननरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.

‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ला आतापर्यंत ५० लाख पर्यटकांची भेट दिली आहे. ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’साठी सुरू करण्यात येत असलेल्या रेल्वेचे डबे व्हिस्टाडोम प्रकारातील असल्यामुळे निसर्ग सौंदर्याचा आनंद प्रवासी घेऊ शकतील, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.