मोठी बातमी – मुंबई पालिकेत उपायुक्त व सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या,चार कार्यकारी अभियंता सहाय्यक आयुक्तपदी

मुंबई महापालिकेत (BMC)चार उपायुक्त व पाच सहाय्यक आयुक्त यांच्या बदल्या(Transfer In BMC) करण्यात आल्या आहेत.

    मुंबई: मुंबई महापालिकेत (BMC)चार उपायुक्त व पाच सहाय्यक आयुक्त यांच्या बदल्या(Transfer In BMC) करण्यात आल्या आहेत. तसेच चार कार्यकारी अभियंत्यांना अतिरिक्त भार म्हणून सहाय्यक आयुक्तपदी बढती(Promotion) देण्यात आली आहे. यात तिघांकडे विभाग कार्यालयाची तर एकाकडे बाजार खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. पालिकेत प्रशासकीय खांदेपालट करण्यात आले आहे.

    पालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून मंगळवारी याचे जारी केले आहेत. यात परिमंडळ दोनचे उपायुक्त विजय बालमवार यांची परिमंडळ एकमध्ये बदली करण्यात आली आहे. तर परिमंडळ एकचे उपायुक्त हर्षद काळे यांच्याकडे परिमंडळ दोनची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्थेचे प्रकल्प संचालक पदाचीही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. परिमंडळ सातचे उपायुक्त विश्वास शंकरवार यांची बदली परिमंडळ पाचमध्ये तर परिमंडळ पाचच्या उपायुक्त डॉ. भाग्यश्री कापसे यांची परिमंडळ सातमध्ये बदली करण्यात आली आहे.

    दहिसर आर-उत्तर विभागाच्या सहाय्यक आयुक्त संध्या नांदेडकर यांची कांदिवली आर-दक्षिण, मुलुंड टी विभागाचे सहाय्यक आयुक्त किशोर गांधी यांची अतिक्रमण निर्मूलन पूर्व उपनगरे, बाजार विभागाच्या सहाय्यक आयुक्त मृदुला अंडे यांची दहिसर आर-उत्तर, अंधेरी के-पश्चिमचे सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांची करनिर्धारण व संकलन, चेंबूर एम-पश्चिमचे डॉ. पृथ्वीराज चौहाण यांची अंधेरी के-पश्चिम, व कुर्ला एल विभागाचे सहाय्यक आयुक्त मनीष वळंजू यांची भायखळा ई विभाग येथे बदली करण्यात आली आहे.

    प्रकाश रसाळ हे सहाय्यक आयुक्त बाजार, राजन प्रभू सहाय्यक आयुक्त मुलुंड टी विभाग, सुरेश सागर सहाय्यक आयुक्त चेंबूर एम-पश्चिम व हरिनारायण साहू यांना सहाय्यक आयुक्त कुर्ला एल विभाग येथे बढती देण्यात आली आहे. हे सर्व यापूर्वी कार्यकारी अभियंता म्हणून काम पाहत होते.