Indications of reshuffle in the Mahavikas Aghadi cabinet giving new faces a chance

मुंबई :ठाकरे सरकार (Thackeray Government)सत्तेत आल्यापासून अनेक सनदी अधिकारयांच्या (transfer of IAS officers)बदल्या झाल्या आहेत. राज्यात कोरोनाचे संकट असताना अधिकाऱ्यांच्या वारंवार होणाऱ्या बदल्यांमुळे महाविकास आघाडी सरकारवर विरोधक सातत्याने टीका करत आहेत. मात्र असे असले तरी बदल्यांचे हे सत्र सरकारकडून सुरूच आहे. राज्यातील आणखी ४ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या अधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी नेमणूका करण्यात आल्या आहेत.

राज्यातील बदली झालेल्या अधिकाऱ्यांची नावे व पदं-

नंदूरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांची बदली सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून करण्यात आली आहे.

प्रदीप डांगे यांची नेमणूक मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गोंदिया या पदावर करण्यात आली आहे.

सिद्धराम साळीमठ यांची नेमणूक मुख्य कार्यकारी अधिकारी ,जिल्हा परिषद ,पालघर या पदावर करण्यात आली आहे.