अनिल देशमुख वसुली आरोप प्रकरणा नंतर ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रातील पोलीस अधिका-यांच्या तडकाफडकी बदल्या

राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिका-यांच्या बदल्या ऐन गणेशोत्सवात करण्यात आल्या आहेत. या मध्ये सहायक पोलीस अधिक्षक श्रेणीमधून अपर पोलीस अधिक्षक श्रेणीमध्ये पदोन्नतींचा देखील समावेश आहे. तर राज्य पोलीस सेवेतील उप आयुक्त असंवर्गातील बदल्यांचा देखील समावेश करण्यात आला आहे.

    मुंबई : राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिका-यांच्या बदल्या ऐन गणेशोत्सवात करण्यात आल्या आहेत. या मध्ये सहायक पोलीस अधिक्षक श्रेणीमधून अपर पोलीस अधिक्षक श्रेणीमध्ये पदोन्नतींचा देखील समावेश आहे. तर राज्य पोलीस सेवेतील उप आयुक्त असंवर्गातील बदल्यांचा देखील समावेश करण्यात आला आहे.

    या शिवाय सहायक पोलीस आयुक्त (नि:शस्त्र) या संवर्गातील अधिका-यांच्या बदल्यांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच भारतीय पोलीस सेवेतील पोलीस उप आयुक्त अपर पोलीस अधीक्षक संवर्गातील अधिका-यांच्या सर्वसाधारण बदल्यांचा समावेश करण्यात आला आहे.

    राज्यातील संपूर्ण पोलीस दलाचा ठाकरे सरकारने फेरबदल केल्याचे या बदल्यांवरून स्पष्ट होत असल्याचे दिसून येत असल्याचे सांगण्यात येत आहे. मागील काही दिवसांपासून परमबीर सिंग आणि रश्मी शुकल् प्रकरणानंतर राज्यातील पोलीस दलाची नाकारात्मक प्रतिमा जनमानसात उमटली होती, तसेच ठाकरे सरकारची देखील अनिल देशमुख वसुली आरोप प्रकरणा नंतर प्रतिमा डागाळण्यात आली होती. त्यामुळे पोलीस दलात मोठ्या फेरबदलांची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. अखेर आज ठाकरे सरकारने मोठ्या प्रमाणात पोलीस दलातील फेरबदल ऐन गणेशोत्सवाच्या उत्सवाच्या धामधुमीत करून मोठा धक्का दिल्याचे मानले जात आहे.