मुंबईतील अधिकाऱ्यांच्या बदल्या, पाहा कुणाची कुठे झाली बदली

विकास रस्तोगी यांची मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव या पदावरून बदली करण्यात आली असून त्यांना नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या प्रकल्प संचालक पदाची जबाबदारी सोपवण्यात आलीय. तर डॉ. मोडक यांना सार्वजनिक आरोग्य खात्याच्या उपसचिव पदाची जबाबदारी देण्यात आलीय.

राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्याबाबतचे तपशील शुक्रवारी जाहीर करण्यात आलेत. या बदल्या रुटीनचा भाग असून त्याची अंमलबजावणी दिलेल्या तारखांनुसार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

विकास रस्तोगी यांची मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव या पदावरून बदली करण्यात आली असून त्यांना नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या प्रकल्प संचालक पदाची जबाबदारी सोपवण्यात आलीय. तर डॉ. मोडक यांना सार्वजनिक आरोग्य खात्याच्या उपसचिव पदाची जबाबदारी देण्यात आलीय.

बदल्यांचे तपशील आणि सध्या देण्यात आलेली जबाबदारी खालीलप्रमाणे

  • विकास रस्तोगी – प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प
  • डॉ. एच. मोडक – उपसचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग
  • डॉ. संदीप राठोड – व्यवस्थापकीय संचालक, हाफकिन बायो-फार्मा कॉर्पोरेशन, मुंबई
  • एस. एल. अहिरे – सहसचिव, महिला आणि बालविकास विभाग
  • अनिल भंडारी – सहआयुक्त, विक्रीकर विभाग, मुंबई
  • सुशील खोडवेकर – उपसचिव, कृषी विभाग, मंत्रालय
  • बी. बी. दांडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, ठाणे