ठाणे पोलीस आयुक्तांसह तीन सनदी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

ठाण्याचे सध्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची देखील बदली करण्यात आली असून त्यांना पोलीस गृहनिर्माण कल्याण महामंडळावर संचालक या पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. ठाणे पोलीस आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार सध्या सह पोलीस आयुक्त सुरेश कुमार मेखला यांच्याकडे देण्यात आला आहे.

    मुंबई : राज्य सरकारने तीन सनदी पोलीस अधिका-यांच्या बदल्या केल्या असून गेल्या काही दिवसांपासून राज्य पोलीस दलात सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांच्या पार्श्वभुमीवर या बदल्यांना वेगळे  महत्व असल्याची माहिती गृह विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.

    ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकरांची बदली
    राज्य सरकारने निर्गमीत केलेल्या आदेशानुसार आता अपर पोलीस महासंचालक विशेष कृती अभियान या पदावरील सनदी पोलीस अधिकारी के वेंकटेशम यांची संचालक नागरी संरक्षण दल या पदावर बदली करण्यात आली आहे. तर राज्य लोहमार्ग पोलीस महासंचालक पदावरील संदीप बिश्नोई यांची बदली महासंचालक न्यायिक व तांत्रिक या पदावर करण्यात आली आहे.

    ठाण्याचे सध्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची देखील बदली करण्यात आली असून त्यांना पोलीस गृहनिर्माण कल्याण महामंडळावर संचालक या पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. ठाणे पोलीस आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार सध्या सह पोलीस आयुक्त सुरेश कुमार मेखला यांच्याकडे देण्यात आला आहे.

    सूत्रानी दिलेल्या माहितीनुसार राज्याचे गृहमंत्री म्हणून दिलीप वळसे पाटील यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्यांदाच झालेल्या या बदल्यांमध्ये महत्वाच्या पदावरील तीन अधिका-यांना तुलनेने कमी महत्वाच्या जबाबदा-या असणा-या पदांवर बदली करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे