बुलेट ट्रेनसाठी झाडांची होणार कत्तल; प्रकल्पाला विरोध  करणारी शिवसेना काय भूमिका घेणार?

मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन हा केंद्र सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. मात्र या प्रकल्पाला शिवसेना, मनसेने विरोध केला आहे. गेल्या आठवड्यात ठाणे पालिकेने भूखंडाचा प्रस्ताव मंजूर केला आहे. त्यामुळे सेनेचा विरोध मावळला की विरोधाची भूमिका कायम ठेवणार अशी चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पालिकेकडे नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनकडून सादर झालेल्या झाडांच्या प्रस्तावाबाबत काय होणार हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.

  मुंबई : मुंबईतील बुलेट ट्रेनच्या बीकेसी वांद्रे स्थानकासाठी झाडे कापण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी ११ झाडे कापणे आणि १४१ झाडांचे पुनर्रोपण केले जाणार आहे. यासाठी नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनने मुंबई महापालिकेकडे परवानगी मागितली आहे. शिवसेनेने या प्रकल्पाला याआधी विरोध दर्शवला होता. त्यामुळे या प्रकल्पासाठी झाडे कापण्याबाबत काय भूमिका घेतली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन हा केंद्र सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. मात्र या प्रकल्पाला शिवसेना, मनसेने विरोध केला आहे. गेल्या आठवड्यात ठाणे पालिकेने भूखंडाचा प्रस्ताव मंजूर केला आहे. त्यामुळे सेनेचा विरोध मावळला की विरोधाची भूमिका कायम ठेवणार अशी चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पालिकेकडे नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनकडून सादर झालेल्या झाडांच्या प्रस्तावाबाबत काय होणार हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.

  बुलेट ट्रेनच्या बीकेसीतील प्रस्तावित वांद्रे स्थानकाआड १८१ झाडे येत आहेत. यातील ११ झाडे कापण्याचे व १४१ झाडे पुनर्राेपित करण्याची परवानगी मागण्यासाठी रेल्वे कॉर्पोरेशनकडून पालिकेकडे प्रस्ताव आला आहे. २९ झाडे आहे तशीच ठेवली जाणार आहेत. बहुतांशी झाडे चाफ्याची आहेत, अशी माहिती पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्याने दिली. झाडांचे पुनर्रोपण बीकेसी परिसरात रेल्वे कॉर्पोरेशनकडून केले जाणार आहे, असेही सांगण्यात आले.

  दरम्यान, बुधवारी दुपारी २.३० ते ३ या वेळात भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील उद्यान विभागाच्या कार्यालयात यावर सुनावणी होणार आहे. या सुनावणीनंतर हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत मांडला जाणार आहे.

  एक मंत्री कोण? ते सांगा. असा हवेत गोळीबार करून चालणार नाही. तसेच कोणी कुणाच्या थोबाडीत मारत नाही. चंद्रकांत पाटील किंवा इतर कुणी अशा अफवा पसरवत असतात. यातून त्यांना आनंद मिळतो. म्हणून त्यांनी त्याचा आनंद घ्यावा. मात्र महाविकास आघाडीचे सरकार तीन वर्षे चालणार आहे. त्यानंतर महाविकास आघाडी पुन्हा सत्तेत येईल. याविषयीदेखील त्यांनी निश्चिंत राहावे.

  - संजय राऊत, खासदार, शिवसेना