मध्य रेल्वेच्या मुंबई विभागील खरे “अनसंग हीरो”

मुंबई: कोविड-१९च्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊनमुळे मध्य रेल्वे फक्त मालवाहतूक गाड्या आणि अत्यावश्यक वस्तू साठी पार्सल गाड्या चालवित आहे, मागील अनेक दिवसांपासून हे काम अविरत सुरु आहे. याशिवाय अशा कठीण परिस्थितीत रेल्वेचे देखभाल आणि सुरक्षा काम इत्यादी बाबी दररोज केल्या जात आहेत. अशा परिस्थितीत चार अनसंग नायकांनी केलेले अथक कार्य कौतुकास पात्र ठरत आहे.

 यात  अब्दुल रशीद, वरिष्ठ विभाग अभियंता (ट्रॅक्शन  वितरण) हे मुंब्रा ते दिवा पर्यंत पायी चालत जाऊन तेथून  त्यांच्या सेक्शनमधील निळजे आणि जुईचंद्र यांच्या दरम्यान मान्सूनपूर्व कामे करण्यासाठी लाॅरीद्वारे जाऊन नियमित कार्य करत आहेत. याशिवाय लोणावळा येथील ओएचई विभागातील सहाय्यक शंकर खाडे हे कुसगाव ते लोणावळा ( ८ किमी) पर्यंत दररोज चालत येऊन काम करीत आहेत.  वयाच्या ५८व्या वर्षी त्यांचे हे काम उल्लेखनीय ठरत आहे.
 तर कादर खान, माझगाव येथील कनिष्ठ अभियंता (सिग्नल) जवळच्या स्टेशनपासून दोन किमी अंतरावर राहतात.  यार्डातील ट्रॅक सर्किटसाठी नवीन ट्रॅक लीड वायर आणि बॉन्ड प्लेट्सची तरतूद, पॉईंट्सची  तपासणी व देखभाल आणि मान्सूनपूर्व आवश्यकतेनुसार केबलचे मेगरिंग करणे यासारख्या सेक्शनमधील देखभाल दुरुस्तीत त्यांनी भरीव सुधारणा केल्या असल्याची माहिती अधिकाऱ्यानी दिली.  बबलू कुमार, यांत्रिक फिटर (मॅकॅनिकल फिटर) हे वरिष्ठ विभाग अभियंता अंतर्गत बोगी विभागात कार्यरत आहेत.  घरापासून शेड पर्यंत दररोज ८ किमी चालत येत असतात.   तपासणीसाठी असलेल्या २  लोकोमोटिव्हच्या ब्रेक गिअरला ते तपासतात, खराब  असलेले ब्रेक ब्लॉक बदलण्याचे काम करत आहेत.
 मध्य रेल्वेचे मुंबई विभागातील यासारखे सर्व कर्मचारी आवश्यक असलेल्या मालवाहतूक आणि पार्सल गाड्यांच्या सुरक्षीत आणि सुरळीत धावण्याकरिता पडद्यामागून काम करत असल्याचे वरिष्ठ अधिकारी सांगतात.