तुळसी तलाव भरुन वाहू लागला; तलावात ८०४६ दशलक्ष लीटर इतक्या जलसाठयाची क्षमता

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या आणि पालिका क्षेत्रातच असणा-या दोन तलावांपैकी महानगरपालिकेचा ‘तुळशी तलाव’ आज सकाळी ११ वाजता पूर्ण भरुन वाहू लागला आहे. गेल्या वर्षी २७ जुलै २०२० रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास हा तलाव भरुन वाहू लागला होता. ८०४६ दशलक्ष लीटर इतक्या जलसाठयाची क्षमता या तलावात आहे.

    मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या आणि पालिका क्षेत्रातच असणा-या दोन तलावांपैकी महानगरपालिकेचा ‘तुळशी तलाव’ आज सकाळी ११ वाजता पूर्ण भरुन वाहू लागला आहे. गेल्या वर्षी २७ जुलै २०२० रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास हा तलाव भरुन वाहू लागला होता. ८०४६ दशलक्ष लीटर इतक्या जलसाठयाची क्षमता या तलावात आहे.

    मुंबईला पाणीपुरवठा करणा-या तलावांपैकी तुळशी तलाव हा सर्वात लहान तलाव असून यातून दररोज सरासरी १८ दशलक्ष लीटर एवढ्या पाण्‍याचा पुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसात या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरून वाहू लागला आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागाने दिली आहे.

    हा तलाव पूर्ण भरून वाहू लागल्यानंतर या तलावाचे पाणी हे विहार तलावाला जाऊन मिळते. त्यामुळे विहार तलाव भरण्यास मदत होते.