दहावी पाठोपाठ बारावीच्या परक्षाही रद्द होणार? शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड निर्णय जाहीर करणार

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उच्च माध्यमिक परिक्षा मंडळाच्या (बारावी) परिक्षा रद्द करण्याबाबत चर्चा करण्यात आली, याभात राज्याच्या मदत आणि पुनर्वसन विभागाकडे प्रस्ताव देण्यात आला असून मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणा-या बैठकीत परिक्षा  रद्द करण्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल अशी माहिती राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री प्रा वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

  मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उच्च माध्यमिक परिक्षा मंडळाच्या (बारावी) परिक्षा रद्द करण्याबाबत चर्चा करण्यात आली, याभात राज्याच्या मदत आणि पुनर्वसन विभागाकडे प्रस्ताव देण्यात आला असून मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणा-या बैठकीत परिक्षा  रद्द करण्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल अशी माहिती राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

  शाररिक आणि मानसिक आरोग्याचा विचार

  राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सह्याद्री अतिथीगृह येथे त्या बोलत होत्या.  या संदर्भात मुख्यमंत्री ठाकरे यांनी पंतप्रधानाशी झालेल्या बैठकीत परिक्षा बाबत देशात निश्चित धोरण ठरवावे अशी मागणी केली होती. तर केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्या सोबत झालेल्या बैठकीत राज्य सरकारच्या वतीने असाधारण स्थिती असल्याने विद्यार्थ्यांच्या शाररिक आणि मानसिक आरोग्याचा विचार करून मुल्यांकनाची परिक्षा न घेता वेगळी व्यवस्था विचारात घेण्याची मागणी करण्यात आली होती.

  लवकरच निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू

  त्यानुसार केंद्र सरकरने आणि काही राज्य सरकारानी परिक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली. राज्यातही याबाबत लवकरच निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहेअसे प्रा गायकवाड यांनी सांगितले. दरम्यान शिक्षण विभागांच्या सूत्रांच्या माहितीनुसार गुरूवारी या विषयावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे, त्यामुळे या सुनावणीमधील निर्णयानंतर येत्या दोन तीन दिवसांत राज्यातील परिक्षा रद्द करण्याबाबत प्रक्रिया पूर्ण करण्यात येण्याची शक्यता आहे.

  पालक संघटनाना समाधान

  आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत परिक्षा रद्द करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आल्या बाबत पालक संघटनेच्या अध्यक्ष अनुभा सहाय यानी देखील समाधान व्यक्त केले आहे. त्या म्हणाल्या की, सध्याच्या कोरोना स्थितीमध्ये परिक्षांच्या बाबतीत ताण आणि धोका पत्करण्याची स्थिती नसल्याने असाधारण निर्णय घेणे आवश्यक होते.