धारावीत २० नवे कोरोना रुग्ण, मृतांचा आकडा १०४ – दादर-माहीममधील रुग्णवाढ अद्याप नियंत्रणात

मुंबई : धारावीतील रुग्णसंख्या नियंत्रणात येत असून आज केवळ २० नवीन रुग्णांची नोंद झाली. धारावीतील रुग्णसंख्या १९८४ वर पोहोचली आहे. धारावीसह दादर-माहीम परिस्थिती ही नियंत्रणात येत असल्याचे

 मुंबई :  धारावीतील रुग्णसंख्या नियंत्रणात येत असून आज केवळ २० नवीन रुग्णांची नोंद झाली. धारावीतील रुग्णसंख्या १९८४ वर पोहोचली आहे. धारावीसह दादर-माहीम परिस्थिती ही नियंत्रणात येत असल्याचे दिसत असून रुग्णसंख्या घटली असल्याचे समोर आले आहे. आज धारावीत २० नवीन रुग्ण सापडल्याने रुग्णांची संख्या १९८४ वर पोहोचली आहे. तर मृतांचा आकडा ७५ वर पोहोचला आहे. 

माहीममध्ये आज १३ नवीन रुग्णांची भर पडल्याने रुग्णांची संख्या ७१४ इतकी झाली आहे. तर मृतांचा आकडा १४ इतका आहे. तर दादरमध्ये आज २५ नवीन रुग्ण सापडले असून एकूण रुग्णांची संख्या ही ४७१ इतकी झाली आहे. तर आजपर्यंत १५ मृत्यू झाले आहेत. धारावीसह दादर आणि माहीम मधील परिस्थिती देखील नियंत्रणात आल्याचे दिसून येत आहे.  जी उत्तर विभागात आज दिवसभरात ५८ नवीन रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णांची संख्या ३१६९ इतकी झाली आहे. तर मृतांचा आकडा १०४ इतका आहे.