1203 crore scam in punjab national bank
पंजाब नॅशनल बँकेत १,२०३ कोटींचा घोटाळा

ओरिएंटल बँक आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया या दोन बँका पंजाब नॅशनल बँकेत विलीन होत असल्यामुळे आता ग्राहकांचे खाते नंबर आणि युजर आयडीदेखील बदलणार आहेत. याचाच अर्थ पूर्वीच्या युजर आयडीचा वापर करून खात्याचे व्यवहार करता येणार नाहीत. नव्या आर्थिक वर्षात म्हणजेच १ एप्रिल २०२१ पासून हे विलीनीकरण लागू होईल. त्यापूर्वी खातेधारकांना नवे युजर आयडी घेण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

    आपलं खातं असणारी बँक जेव्हा दुसऱ्या बँकेत विलीन होते, तेव्हा बँकेप्रमाणे बँकेच्या खातेदारांनाही काही महत्त्वाच्या फॉरमॅलिटीज पूर्ण करणं गरजेचं असतं. व्यवहार सुरळीत सुरू राहण्यासाठी सध्या दोन बँकांच्या ग्राहकांना ही प्रक्रिया पूर्ण कऱणं गरजेचं आहे. ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (OBC) आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया (UBI)  या दोन बँका पंजाब नॅशनल बँकेत (PNB) विलीन होणार आहेत. त्यामुळे या दोन बँकांच्या खातेदारांना काही प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं आहे. विलीनीकरणाची प्रक्रिया पूूर्ण होण्याअगोदर हा बाबी पूर्ण केल्या, तर नंतर धावपळ होणार नाही.

    ओरिएंटल बँक आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया या दोन बँका पंजाब नॅशनल बँकेत विलीन होत असल्यामुळे आता ग्राहकांचे खाते नंबर आणि युजर आयडीदेखील बदलणार आहेत. याचाच अर्थ पूर्वीच्या युजर आयडीचा वापर करून खात्याचे व्यवहार करता येणार नाहीत. नव्या आर्थिक वर्षात म्हणजेच १ एप्रिल २०२१ पासून हे विलीनीकरण लागू होईल. त्यापूर्वी खातेधारकांना नवे युजर आयडी घेण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

    MICR आणि IFSC कोडदेखील बदलणार

    ज्याप्रमाणे बँकेच्या विलीनीकरणानंतर युजर आयडी बदलेल, त्याचप्रमाणे एमआयसीआर आणि आयएफएससी कोडदेखील बदलणार आहे. ऑनलाईन बँकिंग, इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल ऍप वापरणाऱ्या ग्राहकांना आता नव्या तपशीलांसह लॉग इन करावं लागेल. विलीनीकरणापूर्वी जर हे तपशील बदलून घेतले नाहीत, तर १ एप्रिलनंतर जुन्या तपशीलांसह व्यवहार करता येणार नाहीत.