धारावीतून दोन कोटींचे हेरॉईन जप्त, ड्रग्ज तस्कर गजाआड

पोलिसांनी सापळा रचला, त्यात एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले. त्याची तपासणी केली असता त्याच्याकडून १ किलो २०० ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आले आहे.

मुंबई – मुंबई पोलिसांच्या (Mumbai police) अमली पदार्थविरोधी पथकाच्या ड्रग्ज तस्करांविरोधातील ( drugs racket) कारवाईला आणखी एक मोठे यथ मिळाले हे. गुरुवारी धारावीतून (Dharavi) २ कोटी ४० लाख रुपयांचे हेऱॉईन ( heroin )पोलिसांनी जप्त केले आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. या ड्रग्जच्या तस्करीत कोणकोण सामील होते, आणि हे हेरॉईन कुणाला सप्लाय करण्यात येणार होते, याची चौकशी आता पोलीस करीत आहेत.

एंटी नार्कोटिक सेलच्या घाटकोपरच्या पथकाचे पोलीस निरीक्षक शशांक शेळके यांना धारावीत अखिल भारतीय कुंची कोरवे नगरमध्ये ड्रग्जची देवाण घेवाण करण्यात येणार आहे, अशी माहिती मिळाली होती. यानंतर पोलिसांनी सापळा रचला, त्यात एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले. त्याची तपासणी केली असता त्याच्याकडून १ किलो २०० ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आले आहे.

जप्त करण्यात आलेल्या हेऱॉईनची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत २ कोटी ४० लाख रुपये  असल्याची माहिती सांगण्यात येते आहे. पोलिसांनी एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून, मनजार दीन मोहम्मद शेख या आरोपीला अटक करण्यात आली आहे. मनजार हा धारावीतील इंदिरा नगर भागात राहणारा आहे. त्याच्याविरोधात यापूर्वीही अनेक ड्रग्ज तस्करींचे आरोप आहेत.