कोरोना लसीच्या दोन डोसमुळे मृत्यूदरात घट ; ICMR ने अभ्यासातून केला मोठा खुलासा…

कोरोनाची लस न घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये मृत्यूचं प्रमाण हे २० टक्के होतं. एक डोस घेणाऱ्या पोलिसांमध्ये हे प्रमाण ७ टक्के होतं. तर दोन डोस घेणाऱ्या पोलिसात हेच प्रमाण ४ टक्के इतकं होतं.

    कोरोना लसींचे दोन डोस घेतल्यामुळे मृत्यूदर कमी झाल्याचं आयसीएमआरच्या अभ्यासातून समोर आहे. ९५ टक्के मृत्यू रोखण्यात लसींचे दोन डोस यशस्वी ठरले आहेत. तर एक डोस घेणाऱ्या लोकांच्या मृत्यूदरात ८२ टक्के घट झाल्याचं दिसून आलं. कोरोनाकाळात आपलं कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना लसींचे दोन डोस देण्यात आले होते. त्यामुळे सर्वात घातक अशा डेल्टा व्हेरिएंटपासून त्यांचं संरक्षण झालं, अशी माहिती निती आयोग सदस्य डॉक्टर व्ही. के. पॉल यांनी दिली.

    कोरोनाची लस न घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये मृत्यूचं प्रमाण हे २० टक्के होतं. एक डोस घेणाऱ्या पोलिसांमध्ये हे प्रमाण ७ टक्के होतं. तर दोन डोस घेणाऱ्या पोलिसात हेच प्रमाण ४ टक्के इतकं होतं.

    त्याचबरोबर ज्या पोलिसांनी लसीचा एक डोस घेतला होता, त्यांच्यातील प्रभाव क्षमता ही ८२ टक्के इतकी होती. तर दोन डोस घेणाऱ्या पोलिसात हे प्रमाण ९५ टक्के इतकं होतं. या अभ्यासात जवळपास १ लाख १७ हजार ५२४ पोलिसांची माहिती घेण्यात आली.