सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात महत्त्वाचा दुवा हाती, दोन ड्रग्ज डिलर्स अटकेत, दीड कोटींचे ड्रग्जही केले जप्त

एनसीबीने मुंबईतील मिल्लत नगर येथील अलहतीम सोसायटीत छापा घातला. या कारवाईत दीड कोटींचे मलाना क्रीम, काही गांजा, १३ लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. रीगल महाकाल आणि त्याचा बॉस आजम शेख यांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने एनसीबीच्या ६ अधिकाऱ्यांनी ही मोठी कारवाई केली आहे. 

मुंबई- अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आतमहत्येनंतर, या प्रकरणाचा तपास बॉलिवूड-ड्रग्ज कनेक्शन या दिशेने करण्यात येतो आहे. या प्रकरणाचा तपास करणारी एनसीबी दररोज नवनवी प्रकरणे उजेडात आणत आहे. बॉलिवूडमधील अनेकांच्या चैकशीनंतर, आत्तापर्यंत या प्रकरणात एनसीबीने ३४ जणांची चौकशी केली आहे. या चौकशीच्या आधारे बॉलिवूडला ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्या ड्रग्ज पेडलर्सना अटकही करण्यात आली आहे.

याच कारवाईच्या साखळीत एनसीबीने मुंबईतील मिल्लत नगर येथील अलहतीम सोसायटीत छापा घातला. या कारवाईत दीड कोटींचे मलाना क्रीम, काही गांजा, १३ लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. रीगल महाकाल आणि त्याचा बॉस आजम शेख यांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

 स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने एनसीबीच्या ६ अधिकाऱ्यांनी ही मोठी कारवाई केली आहे.

ड्रग्ज डिलर रिगेल महाकाल याला अलहितम सोसायाटीतील आजम शेख याच्या घरातून अटक करण्यात आली आहे. महाकाल आणि आजम शेख यांना झालेली अटक ही सुशांतसिंह प्रकरणात महत्त्वाची मानण्यात येते आहे. या दोघांच्या अटकेमुळे बॉलिवूड-ड्रग्ज कनेक्शन प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती हाती येण्याची शक्यता आहे. महाकाल याला एनडीपीएस कोर्टात हजर करण्यात आल्यानंतंर, कोर्टाने त्याला दोन दिवसांची एनसीबी कोठडी दिली आहे, तर त्याचा बॉस आजम खान याला आज म्हणजेच गुरुवारी कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

एनसीबी गेल्या अनेक काळापासून रिगेल महाकाल याचा शोध घेत होती. अनुज केशवानीमार्फत रिया आणि सुशआंतला ड्रग्ज पुरविण्याचे काम रिगेल महाकाल करीत होता. एनसीबीने टाकलेल्या छाप्यात ड्रग्जचा साठाही सापडल्याने रिगेल महाकालच्या अडचणी वाढल्या आहेत. या दोघांच्या अटकेनंतर सुशांतसिंह प्रकरणातील ड्रग्जच्या साखळीतील सर्वांना अटक करण्यात आल्याचा दावा एनसीबीने केला आहे. सुशांतसिंहपर्यंत येणाऱ्या ड्रग्जच्या साखळीचा बिमोड केल्याचे एनसीबीचे म्हणणे आहे.

ड्रग्जच्या या महाजालात रिगेल महाकाल, अनुज केसवानी, कैजान, रिया आणि सुशांत सामील होते. रिगेलच्या अटकेनंतर आता या प्रकरणात बॉलिवूडमधील आणखी काही मोठी नावे एनसीबीच्या हाती येण्याची शक्यता आहे. त्याच्या चौकशीतून बॉलिवूड-ड्रग्ज कनेक्शन प्रकरणाला वेगळी दिशा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.