IPL टीम Logo's Photo
IPL टीम Logo's Photo

पुढच्या वर्षी म्हणजेच आयपीएल २०२१ (IPL 2021) मध्ये आणखी दोन टीमचा समावेश होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार बीसीसीआयच्या (BCCI) वार्षिक सर्वसाधारण सभेच्या एजेंड्यामध्ये दोन नव्या टीम सामील करण्याचा मुद्दा ठेवण्यात आला आहे. या बैठकीमध्येच दोन टीमबाबत अंतिम निर्णय होईल. २४ डिसेंबरला मुंबईमध्ये बीसीसीआयची बैठक होणार आहे. या बैठकीत २०२८ सालच्या लॉस ऍन्जलिसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याबाबतही विचार केला जाणार आहे.

मुंबई (Mumbai).  पुढच्या वर्षी म्हणजेच आयपीएल २०२१ (IPL 2021) मध्ये आणखी दोन टीमचा समावेश होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार बीसीसीआयच्या (BCCI) वार्षिक सर्वसाधारण सभेच्या एजेंड्यामध्ये दोन नव्या टीम सामील करण्याचा मुद्दा ठेवण्यात आला आहे. या बैठकीमध्येच दोन टीमबाबत अंतिम निर्णय होईल. २४ डिसेंबरला मुंबईमध्ये बीसीसीआयची बैठक होणार आहे. या बैठकीत २०२८ सालच्या लॉस ऍन्जलिसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याबाबतही विचार केला जाणार आहे.

ईएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार आयपीएल संपल्यापासूनच दोन नव्या टीम आणण्याबाबत चर्चा सुरू आहे. बोर्डाच्या बड्या अधिकाऱ्यांमध्ये दोन नव्या टीम आणण्याबाबत आयपीएल फायनलदरम्यानच अनौपचारिक बैठक झाली होती. या बैठकीला बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि बोर्डाचे सचिव जय शाह उपस्थित होते. या मुद्द्यावरून आयपीएलच्या गव्हर्निंग काऊन्सिलची बैठक होणार होती, पण याबाबत औपचारिक चर्चा झालेली नाही, पण आता बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत यावर विचार केला जाईल, असं सांगण्यात येत आहे.