राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन मंत्री अडचणीत, पक्षाकडून लवकरच मोठ्या घोषणेची शक्यता?

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचे विवाहबाह्य संबंध आहेत आणि या संबंधातून आपल्याला दोन मुलं आहेत, अशी कबुली दिली. तसंच त्यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे, त्यामुळे भाजपकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. तर दुसरीकडे नवाब मलिक यांचा जावई समीर खान याला ड्रग्जप्रकरणी एनसीबीने अटक केली आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन मंत्री अडचणीत आल्यानंतर पक्षाच्या हालचाली वाढल्या आहेत. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि अल्पसंख्यांक विकासमंत्री नवाब मलिक या दोन मंत्र्यांवर आरोपांचा भडीमार सुरू आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे यशवंतराव चव्हाण सभागृहात आले आहेत. तर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयात आले आहेत.

धनंजय मुंडे यांचे विवाहबाह्य संबंध आहेत आणि या संबंधातून आपल्याला दोन मुलं आहेत, अशी कबुली दिली. तसंच त्यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे, त्यामुळे भाजपकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. तर दुसरीकडे नवाब मलिक यांचा जावई समीर खान याला ड्रग्जप्रकरणी एनसीबीने अटक केली आहे.

जावयाला अटक केल्यामुळे नवाब मलिक अडचणीत आले आहेत. या वादावर त्यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. ‘कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. कायदा सगळ्यांसाठी समान आहे. योग्य न्याय मिळेल. न्यायव्यवस्थेवर माझा पूर्णपणे विश्वास आहे,’ असं नवाब मलिक म्हणाले.