भिवंडीत आढळले नवीन दोन कोरोनाबाधित  रुग्ण

भिवंडी:  राज्यासह संपूर्ण देशामध्ये कोरोना विषाणू ने धुमाकूळ घालत आहे. मुंबईत ठीक ठिकाणी या कोरोनाचे हॉटस्पॉट तयार होत आहेत. अशातच आता कोरोनाचा शिरकाव आता भिवंडीतही वाढू लागला असून आज शहरातील वेताळपाडा व औचित पाडा या भागात दोन कोरोना पॉझिव्हिव्ह रुग्ण आढळून आल्याने परिसरात खळबळ माजली आहे.

 भिवंडी:  राज्यासह संपूर्ण देशामध्ये कोरोना विषाणू ने धुमाकूळ घालत आहे. मुंबईत ठीक ठिकाणी या कोरोनाचे हॉटस्पॉट तयार होत आहेत. अशातच आता कोरोनाचा शिरकाव आता भिवंडीतही वाढू लागला असून आज शहरातील वेताळपाडा व औचित पाडा या भागात दोन कोरोना पॉझिव्हिव्ह रुग्ण आढळून आल्याने परिसरात खळबळ माजली आहे  आता पर्यंत एकूण चार रुग्णाची भिवंडीत नोंद झाली आहे तर ११४ जणांना कोरोटाईन करण्यात आले आहे . ्र हा प्रकार वाढू लागल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे 

 संवेदनशील व कामगार नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भिवंडी शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी शासन व पोलीस व महानगर पालिका प्रशासनाकडून खबरदारी घेण्याची उपाययोजना केल्या जात आहेत मात्र अनेक ठिकाणी जंतुनाशक औषद फवारणी व कचरा उचलण्यास दिरंगाई केली जात आहे त्यामुळे नगरसेवकांसह नागरिक व पोलिसांनी नाराजी व्यक्त केली आहे असे असतानाच शहरातील वेताळपाडा या भागात व्यवसायासाठी मालेगाव येथून आलेला  २३ वर्षीय  तर बांद्रा मुबई येथे टेलरींग कामकारणारा ५३ वर्षीय कामगार हा औचितपाडा राहत्या घरी आला होता हे दोन इसम आले असून ते कोरोनाची लागण झालेले  रुग्ण असल्याची माहिती पालिकाच्या मुख्यवैद्यकीय आरोग्य विभागाच्या डॉक्टरांना दोन दिवसापूर्वी मिळाले त्यामुळे सदर इसमांना डॉक्टरांनी ताब्यात घेऊन त्यांच्या स्वब चे नमुने मुबईतील हाफकिन प्रयोगशाळा येथे तपासणी साठी पाठविणात  आले होते सदरचे दोन्ही रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले त्यामुळे आज सकाळी त्या दोघांना ताब्यात घेऊन पुढील उपचारासाठी  ठाण्यातील सिव्हिल  रुग्णालयात पाठविण्यात  आल्याची माहिती पालिका आयुक्त डॉ प्रवीण आष्टीकर यांनी दिली तसेच दोन्ही कुटूंबातील एकूण १३ जणांना कोरोटाईन करून त्यांना भिवंडीतील कोरोटाईन सेंटर मध्ये ठेवण्यात आले आहे     
 
 भिवंडी हे दाटीवाटीचे शहर म्हणून ओळख असल्याने येथे महापालिका प्रशासनाने काळजी घेणे आवश्यक आहे मात्र अनेक ठिकाणी सोशलडिस्टस व मास लावण्यासारखे प्रकार होत नसल्याचे आढळून येत आहे भिवंडीतील ओचीतपाडा व वेताळपाडा परिसरात रुग्ण आढळून आल्याने सदरचा परिसर सिलबंद करण्यात आले असून परिसरातील नागरिकांचे सुरक्षेतेसाठी ४० जणांचा पथक नेमण्यात आल्याची महिती आयुक्तांनी दिली.