Aditya Thackeray's idea is very expensive; The cost of one day's maintenance of a penguin is equal to one worker's monthly salary

सध्या या पेंग्विन कक्षात असलेल्या ७ पेंग्विनपैकी डोनाल्ड व डेसी या नर मादीच्या जोडीने दिलेल्या एका अंड्यामधून १ मे २०२१ रोजी एक पिल्लू जन्माला आले असून त्याचे नाव 'ओरिओ' (नर) असे ठेवण्यात आले आहे. आता त्याचे वय चार महिन्याचे असून तो पालकांबरोबर इतर पेंग्विनसोबत चांगलाच रुळला आहे. तर मोल्ट व फ्लिपर या नर मादीच्या जोडीनेही दिलेल्या एका अंड्यामधून १९ ऑगस्ट २०२१ रोजी नवजात पिल्लू जन्माला आले असून तो नवजात असल्याने ते पिल्लू नर की मादी हे अद्याप समजू शकलेले नाही.

  मुंबई : भायखळा येथील राणीच्या बागेतील पेंग्विन कक्षात १ मे ते १९ ऑगस्ट दरम्यान दोन नवीन पाहुण्यांचे आगमन झाले आहे. पेंग्विनने दोन पिल्लांना जन्म दिला असून यापैकी एक नर जातीचे पिल्लू आहे तर दुसऱ्या पिल्लाचे अद्याप लिंग परीक्षण झालेले नाही. ही दोन्ही पिल्ले सुखरूप आहेत. पेंग्विन कक्षात आता ३ प्रौढ नर ४ प्रौढ मादी आणि दोन पिल्लू असे एकूण ९ पेंग्विन झाले आहेत.

  सध्या या पेंग्विन कक्षात असलेल्या ७ पेंग्विनपैकी डोनाल्ड व डेसी या नर मादीच्या जोडीने दिलेल्या एका अंड्यामधून १ मे २०२१ रोजी एक पिल्लू जन्माला आले असून त्याचे नाव ‘ओरिओ’ (नर) असे ठेवण्यात आले आहे. आता त्याचे वय चार महिन्याचे असून तो पालकांबरोबर इतर पेंग्विनसोबत चांगलाच रुळला आहे. तर मोल्ट व फ्लिपर या नर मादीच्या जोडीनेही दिलेल्या एका अंड्यामधून १९ ऑगस्ट २०२१ रोजी नवजात पिल्लू जन्माला आले असून तो नवजात असल्याने ते पिल्लू नर की मादी हे अद्याप समजू शकलेले नाही.

  ते पिल्लू घरट्याबाहेर रुळायला लागेल तेव्हा त्याची तपासणी केली जाईल. याबाबतची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी प्राणी संग्रहालयाचे संचालक डॉ.संजय त्रिपाठी, पालिका सभागृह नेत्या विशाखा राऊत, उद्यान अधिक्षक जितेंद्र परदेशी आदी उपस्थित होते.

  मुंबईकरांना बर्फाळ वातावरणात राहणाऱ्या पेंग्विनचे दर्शन कृत्रिम बर्फाळ वातावरणात घडावे या उद्देशाने तत्कालीन युवा सेना नेते व आताचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून राणीच्या बागेत २०१७ ला उत्तर कोरिया येथून ८ पेंग्विन आणण्यात आले होते. त्यापैकी एका पेंग्विनचा जंतूसंसर्गामुळे मृत्यू झाला. तर उर्वरित ३ प्रौढ नर आणि ४ प्रौढ मादी पेंग्विनपैकी एक डोनाल्ड व डेसी या नर मादीच्या जोडीने १ मे २०२१ रोजी जन्माला घातलेल्या पिल्लाचे ‘ओरिओ’ (नर) असे नाव ठेवण्यात आले.

  तर मोल्ट व फ्लिपर या नर मादीच्या जोडीने १९ ऑगस्ट २०२१ रोजी एक पिल्लू जन्माला घातले आहे. मात्र ते अद्यापही घरट्यात पालकांच्या कुशीत असल्याने त्याचे लिंग परीक्षण झालेले नाही. ते पिल्लू पालकांसह इतर पेंग्विनसोबत रुळायला लागला की, त्याचे लिंग परीक्षण करून त्याचेही नामकरण करण्यात येईल, असे प्राणी संग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी सांगितले.

  पेंग्विन कक्षात रुळली पिल्ले

  ‘ ओरिओ’ हा चार महिन्यांचा पिल्लू सध्या त्याच्या पालकांसोबत पाण्यात पोहतो, स्वतः स्वतःची काळजी घेत आहे. तो बबल या मादी पेंग्विनसोबत जास्त वेळ घालवतो. इतर पेंग्विनसोबतही तेथील वातावरणात चांगला रुळला आहेत. तो इतर पेंग्विनप्रमाणेच मासे खातो. पुढील आठ महिन्यात तो एक वर्षाचा होईल व इटर प्रौढ पेंग्विनसारखाच दिसू लागणार आहे.

  १९ ऑगस्ट रोजी मोल्ट व फ्लिपर या नर मादी जोडीनेही एका पिल्लाला जन्म दिला आहे. ते पिल्लू सध्या अगदीच नवजात असल्याने पालकांसोबत घरट्यात राहत आहे. त्यामुळे त्याचे लिंग परीक्षण अद्याप करण्यात आलेले नाही. ते नर की मादी हे ओळखणे कठीण आहे. आता हे पिल्लू २५ दिवसांचे झाले आहे. सध्या त्याचे पालकच त्याचे संगोपन करीत आहेत. मात्र त्यांना आवश्यक व पूरक आहार तज्ज्ञांमार्फत नियमितपणे दिला जात आहे. या पिल्लाची रोगप्रतिकार शक्ती कमकुवत असल्याने त्याची तीन महिन्यापर्यंत अधिक काळजी घेणे आवश्यक असते.