दोन्ही विरोधी पक्षनेत्यांनी घेतला नाशिक विभागातील कोरोना स्थितीचा आढावा, विभागीय आयुक्तांशी देखील केली चर्चा 

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर(devendra fadanvis and pravin darekar nashik visit) यांनी आज नाशिकचा दौरा( opposition leaders nashik visit)  केला.

  मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर(devendra fadanvis and pravin darekar nashik visit) यांनी आज नाशिकचा दौरा( opposition leaders nashik visit)  केला. त्यात त्यांनी रुग्णांची वाढणारी संख्या, ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरचा तुटवडा, खासगी रुग्णालयात रुग्णांची होणारी आर्थिक पिळवणूक तर सरकारी रुग्णालयात सोयी-सुविधांचा असलेला अभाव यामुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेली संतापाची भावना, या सर्व परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला.

  यावेळी त्यांच्याबरोबर खासदार भारतीताई पवार, माजी मंत्री गिरीष महाजन, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले, महापौर सतीश कुलकर्णी यासह अनेक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

  बिटको कोविड सेंटरला भेट

  दोन्ही विरोधी पक्ष नेते व त्यांच्यासमवेत असलेल्या लोकप्रतिनिधींनी आज नाशिक जिल्हा रूग्णालयाला तसेच नाशिक महानगरपालिकेने उभारलेल्या बिटको कोविड सेंटरला भेट दिली. तेथील व्यवस्थेची पाहणी केली. तसेच सिव्हिल सर्जन यांच्याकडून अडचणींबाबत माहितीही घेतली. सर्व परिस्थितीची पाहणी केल्यानंतर विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे व त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर नाशिक विभागातील आरोग्य व्यवस्था, औषध साठा व अनुषंगिक विषयांबाबत सविस्तर आढावा देखील घेतला.

  सर्वाधिक मदत साहित्य महाराष्ट्राला
  यावेळी माध्यमांशी बोलताना दरेकर म्हणाले, नाशिकमध्ये ऑक्सिजन आणि रेमडेसेवीरचा साठा मर्यादित असून त्याचा पुरवठा वाढविण्याची आवश्यकता आहे. नाशिकमधील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा दर ३० टक्क्यांवर गेला असून नाशिकच्या एकूण परिस्थितीबाबत देवेंद्रजी फडणवीस यांनी केंद्राशी चर्चा सुद्धा केली आहे.

  देशात सर्वाधिक ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिवीर महाराष्ट्राला मिळाले असून त्याचा नियोजनबद्ध व पुरेपूर वापर झाला पाहिजे तसेच राज्य सरकारने सर्व जिल्ह्यांना आवश्यकतेनुसार वाटप केले पाहिजे.