मुंबईत स्फोटकांनी भरलेली कार सापडल्याच्या प्रकरणाला नवे वळण, दोघांना एनआयएकडून अटक

मुंबईतील (Mumbai) मायकल रोडवर ( michael road) स्फोटकांनी भरलेल्या कारच्या प्रकरणात नवी माहिती मिळाली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेनं (NIA) दोन जणांना या प्रकरणामध्ये अटक(Arrest) केली आहे.

    मुंबई : मुंबईतील (Mumbai) मायकल रोडवर ( michael road) स्फोटकांनी भरलेल्या कारच्या प्रकरणात नवी माहिती मिळाली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेनं (NIA) दोन जणांना या प्रकरणामध्ये अटक(Arrest) केली आहे. यापैकी एका जणाला लातूरमधून अटक केली आहे. दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना २१ जूनपर्यंत एनआयए कोठडी सुनावण्यात आली आहे.

    एनआयएच्या पथकाने दोन जणांना अटक केली आहे. संतोष आणि आनंद अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नाव आहे. यातील एकाला लातूरमधून अटक केले आहे. दोघांना NIA च्या विशेष कोर्टात हजर करण्यात आले असता २१ जूनपर्यंत कोठडी सुनावली आहे. या दोघांचा या प्रकरणामागे काय हात होता, याचा तपास एनआयए करत आहे.

    दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मनसुख हिरेन (Mansukh Hiren Death Case) याच्या मृत्यूबद्दल अहवाल समोर आला आहे. मनसुख हिरेन यांच्यावर विषप्रयोग झालेला नाही. मनसुख यांच्या शरीरात कोणतेही विषद्रव्य आढळले नाही. यामुळे या मृत्यूप्रकरणाचे गूढ अजूनही कायम आहे. मनसुखचा मृत्यू कशामुळे झाला, याबाबत तपास यंत्रणा पुन्हा संभ्रमात आहेत.

    याधीही शवविच्छेदन अहवालामध्ये धक्कादायक खुलासा झाला होता. हिरेन यांचा शवविच्छेदनाचा अहवाल एनआयएच्या टीमकडे आला होता. हिरेन यांचा मृत्यू पाण्यात बुडून झाला आहे. त्यांच्या फुफ्फुसामध्ये खाडीतील पाणी आढळले आहे, असं या रिपोर्टमध्ये स्पष्ट करण्यात आहे. पण, त्यांचा मृत्यू कसा झाले हे मात्र अद्याप समोर येऊ शकले नाही.