Two thousand notes printed by a jeweler in Mumbai; 40 lakh counterfeit notes seized from Hotel Madhuva

पोलिस अधिकाऱ्यांना मालाड पश्चिम येथील माइंडस्पेसमधील एका हॉटेलच्या खोलीतून 2,000 रुपयांच्या बनावट नोटांचे गठ्ठे सापडले. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कॅमेरूनियन असलेल्या जॉन पॅसिफिक आणि फ्रँक स्टीफन यांनी बुधवारी हॉटेलमध्ये चेक इन केले, पण दुसऱ्या दिवशी सकाळी हॉटेलला न सांगता निघून गेले.

    मुंबई : बांगूरनगर पोलिसांनी मालाडमधील एका हॉटेलच्या खोलीतून 39.64 लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. या नोटा छापणाऱ्या एका ज्वेलरला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी कॅमेरून या देशातील दोन आरोपीं फरार आहेत.

    पोलिस अधिकाऱ्यांना मालाड पश्चिम येथील माइंडस्पेसमधील एका हॉटेलच्या खोलीतून 2,000 रुपयांच्या बनावट नोटांचे गठ्ठे सापडले. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कॅमेरूनियन असलेल्या जॉन पॅसिफिक आणि फ्रँक स्टीफन यांनी बुधवारी हॉटेलमध्ये चेक इन केले, पण दुसऱ्या दिवशी सकाळी हॉटेलला न सांगता निघून गेले.

    याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यावर, पोलिसांनी सापळा रचत तिथे धाड टाकली असता बनावट नोटा सापडल्या. सर्व माहितीच्या आधारे पोलिसांनी ज्वेलरला अटक केली.