पालिका रुग्णालयात ऑक्सीजनची दोन वर्षांची तरतूद, तिसऱ्या लाटेसाठी प्रशासनाची तयारी…

पुढील दोन वर्ष १ कोटी ३३लाख घन मिटर द्रवरुप प्राणवायूचा पुरवठा होणार आहे. त्यासाठी महानगर पालिका २७ कोटी ७ लाख रुपये खर्च करणार आहे. रुग्णालये आता त्यांच्या गरजेनुसार ऑक्सीजनची मागणी करु शकणार आहेत. हा ऑक्सीजन प्रामुख्याने रुग्णालयात होणाऱ्या नियमित उपचारांसाठी वापरण्यात येणार आहे. तिसऱ्या लाटेसाठी कोविड रुग्णांना लागणाऱ्या ऑक्सीजनसाठी स्वतंत्र पणे तरतूद करण्यात येत आहे.

    मुंबई : कोरोनाच्या काळात मुंबईत ऑक्सीजन मिळत नसल्याच्या तक्रारीमुळे नागरिक हवालदिल झाले आहेत.परंतु पालिकेने त्याची तयारी केली असून ऑक्सीजन प्लांट बरोबरच पालिकेच्या रुग्णालयांना पुढील दोन वर्ष सलग ऑक्सीजन पुरवठा करण्यासाठी तरतूद केली असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

    रुग्णालयांमध्ये नियमीत उपचारांसाठी लागणारा ऑक्सीजन विकत घेण्यासाठी पालिकेने दोन वर्षांचे कंत्राट देण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान कोविड काळात मुंबईसह देशात ऑक्सीजनचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. मुंबईत कोरोना रुग्णांच्या योग्य नियोजनामुळे ऑक्सीजनचा तुटवडा आता जाणवत नाही. मात्र, तिसऱ्या लाटेत ऑक्सीजनची गरज वाढण्याची लक्षात घेऊन पालिकेने आता पासून तयारी सुरु केली आहे.पालिका रुग्णालयांना नियमितपणे लागणाऱ्या ऑक्सीजनसाठी कंत्राट देण्याचा निर्णय घेतला आहे. दोन वर्ष हा पुरवठा होणार आहे.

    दरम्यान या प्रस्तावाला स्थायी समितीच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली. पुढील दोन वर्ष १ कोटी ३३लाख घन मिटर द्रवरुप प्राणवायूचा पुरवठा होणार आहे. त्यासाठी महानगर पालिका २७ कोटी ७ लाख रुपये खर्च करणार आहे. रुग्णालये आता त्यांच्या गरजेनुसार ऑक्सीजनची मागणी करु शकणार आहेत. हा ऑक्सीजन प्रामुख्याने रुग्णालयात होणाऱ्या नियमित उपचारांसाठी वापरण्यात येणार आहे. तिसऱ्या लाटेसाठी कोविड रुग्णांना लागणाऱ्या ऑक्सीजनसाठी स्वतंत्र पणे तरतूद करण्यात येत आहे.