नवी मुंबईत मराठा समाजाच्या बैठकीला उदयनराजे येणार नाहीत, साताऱ्यात घेणार स्वतंत्र बैठक

मराठा समाज या मागण्यांसाठीच बैठका घेत आहे. आज होणाऱ्या माथाडी समाजाची बैठकीला छत्रपती संभाजीराजे आणि छत्रपती उदयनराजे उपस्थित राहणार होते. यामुळे सर्वांचे लक्ष या बैठकीकडे वेधले गेले होते. पण आता उदयनराजे हे बैठकीत उपस्थित राहणार नाहीत. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आले आहे.

मुंबई : नवी मुंबईतील माथाडी भवनात होणाऱ्या मराठा समाजाच्या बैठकीला (meeting of Maratha community) खासदार उदयनराजे भोसले  (Udayan Raje) येणार नाहीत असी माहिती मिळाली आहे. या बैठकीकडे सर्वांच्याच नजरा लागल्या होत्या. कारण उदयनराजे भोसले आणि संभाजी राजे (Sambhaji Raje) पहिल्यांदाच मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर एकत्र येणार होते. परंतु उदयनराजे हे बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचे बोलले जात आहे.

नवी मुंबईत माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी आज मराठा क्रांती मोर्चाची बैठक बोलावली होती. या बैठकीला छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पाठ फिरवली आहे. ते लवकरच साताऱ्यात माराठा क्रांती मोर्चाची राजव्यापी बैठक घेणार आहे. साताऱ्यात होणाऱ्या या बैठकीचे नेतृत्व स्वतः उदयनराजे भोसले करणार असल्याचे समजते आहे.
मराठा समाजाच्या आरक्षणाला कोर्टात स्थगिती दिल्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. त्यामध्येच राज्यात होणारी एमपीएससी परीक्षेला तूर्तास स्थिगिती द्यावी आणि पोलीस भरती देखील थांबवावी अशी मागणी मराठा समाजाकडून जोर धरत आहे.

मराठा समाज या मागण्यांसाठीच बैठका घेत आहे. आज होणाऱ्या माथाडी समाजाची बैठकीला छत्रपती संभाजीराजे आणि छत्रपती उदयनराजे उपस्थित राहणार होते. यामुळे सर्वांचे लक्ष या बैठकीकडे वेधले गेले होते. पण आता उदयनराजे हे बैठकीत उपस्थित राहणार नाहीत. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आले आहे.

उदयनराजे उपस्थित राहतील – नरेंद्र पाटील

उदयनराजे भोसले बैठकीला उपस्थित राहणार नसल्याची माहिती सगळीकडे पसरली असताना उदयनराजे आणि संभाजीराजे हे दोघेही या बैठकीला उपस्थिती लावतील असा दावा नरेंद्र पाटील यांनी केली आहे. नरेंद्र पाटील म्हणाले की, उदयनराजे आता पुण्याला आहेत. त्यांना तिथून नवी मुंबईला पोहोचायला दीड तास लागतो. तसेच दोन्ही राजे उपस्थित असल्यावर आम्ही बैठक सुरु करणार आहोत. असे मत नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केले आहे.