Uddhav and Raj Thackeray

महाविकास आघाडी सरकार कोणत्याही सण-समारंभांविरुद्ध नाही तर कोरोनाच्या विरोधात आहे. कोराना हा काही सरकारी कार्यक्रम नाही, कोरोनाला अटकाव घालण्यासाठी जगभरात जी शिस्त आणि नियम सांगितले आहेत त्याचे पालन करावेच लागेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी स्पष्ट केले. केंद्र सरकारनेच या सणांदरम्यान संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त करून राज्य सरकारला काळजी घ्यायला सांगितल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. माझे काही म्हणणे नाही. समजदार नागरिकांना वेगळे सांगण्याची गरज नाही, असा टोला मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजपा आणि मनसेला लगावला.

    मुंबई : राज्यातील मंदिरे उघडण्याची मागणी करत भाजपाने सोमवारी राज्यभरात शंखनाद आंदोलन केल्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही (मनसे) मंदिरांसाठी मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी तसे स्पष्ट संकेत दिले. मंदिर उघडण्यासाठी मनसेकडून घंटानाद आंदोलन केले जाईल, असा इशारा राज यांनी दिला आहे.

    मंदिरे उघडली गेलीच पाहिजेत. आजचा दिवस जाऊ द्या. नंतर मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांची बैठका घेणार आहे. त्यात आम्ही याबाबत चर्चा करूच. सगळी मंदिरे उघडलीच पाहिजेत नाहीतर सगळ्या मंदिरांच्या बाहेर घंटानाद करू. घराबाहेर पडायला हे लोकं घाबरतात, त्यात आमचा काय दोष? असा सवाल राज ठाकरेंनी केला.

    महाविकास आघाडी सरकार कोणत्याही सण-समारंभांविरुद्ध नाही तर कोरोनाच्या विरोधात आहे. कोराना हा काही सरकारी कार्यक्रम नाही, कोरोनाला अटकाव घालण्यासाठी जगभरात जी शिस्त आणि नियम सांगितले आहेत त्याचे पालन करावेच लागेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी स्पष्ट केले. केंद्र सरकारनेच या सणांदरम्यान संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त करून राज्य सरकारला काळजी घ्यायला सांगितल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. माझे काही म्हणणे नाही. समजदार नागरिकांना वेगळे सांगण्याची गरज नाही, असा टोला मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजपा आणि मनसेला लगावला.

    कोरोना हा काही सरकारी कार्यक्रम नाही. त्यामुळे कुणाला आंदोलन करायचे असेल तर सरकारविरुद्ध न करता कोरोनाविरुद्ध करा. लोकांचे जीव वाचवण्यासाठी करा. पण काही लोकांमध्ये तेवढी प्रगल्भता, कुवत आणि हिंमतही नसते. त्यांना फक्त रस्त्यावर उतरून गोंधळ घालायचा असतो. अशा बेजबाबदार लोकांबद्दल न बोललेलंच बरं असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लगावला.