Ashish Shelar directly targets Aditya Thackeray

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(uddhav thackeray) बॉलिवूडकडे(bollywood ) लक्ष देतात, त्यांचे चिरंजीव म्हणजे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे(aditya thackeray) पबकडे(pub) लक्ष देतात. असे म्हणत भाजप नेते आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे.

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(uddhav thackeray) बॉलिवूडकडे(bollywood ) लक्ष देतात, त्यांचे चिरंजीव म्हणजे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे(aditya thackeray) पबकडे(pub) लक्ष देतात. असे म्हणत भाजप नेते आशिष शेलार(ashish shelar) यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे.

ठाकरे सरकार पळपुटे आणि पराधीन आहे, अशी घणाघाती टीकाही आशिष शेलार यांनी केली आहे. “ठाकरे सरकारने ना पॅकेज दिले ना मदत. मागणी केली की केंद्राकडे बोट दाखवतात, मराठा आरक्षणावर विचारलं की सुप्रीम कोर्टाकडे बोट दाखवतात, बदल्यांचा विषय आला की दलालांकडे बोट दाखवतात असे म्हणत शेलारांनी ठाकरे सरकारच्या काराभारावर भाष्य केले.

ठाकरे सरकारला बॉलिवूड आणि पब या दोनच गोष्टींची चिंता आहे, असा हल्लाबोलही आशिष शेलारांनी केला.