मुख्यमंत्री बाहेर पडा म्हणणाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी दिले प्रत्युत्तर

तसेच टिका करणारे ज्या दुर्गम भागात पोहचू शकले नाहीत त्या ठिकाणी मी जाऊन आलोय. तिथल्या लोकांशी संवाद साधला आहे. तुम्ही फिरत आहात. मी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सगळीकडे फिरत आहे. असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. कोरोनाचं संकट नाही तर इतर वादळंही येऊन गेली आहेत.

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाने (coronavirus) धूमाकूळ घातला आहे. नागरिकांना नाहक त्रास होत आहे. समस्यांना सामोरे जावे लागत आहे. आर्थिक परिस्थिती खालावली आहे. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) घरात बसून असतात, ते घराबाहेर पडत नाहीत. अशी टीका माझ्यावर सुरु आहे. मात्र त्यांना हे कळत नाही की तुम्ही जिथे जाऊ शकलेला नाहीत तिथे मी व्हिडीओ कॉन्फन्सिंगच्या माध्यमातून जाऊन आलो आहे. तिथल्या लोकांशी मी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला आहे.

तसेच टिका करणारे ज्या दुर्गम भागात पोहचू शकले नाहीत त्या ठिकाणी मी जाऊन आलोय. तिथल्या लोकांशी संवाद साधला आहे. तुम्ही फिरत आहात. मी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सगळीकडे फिरत आहे. असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. कोरोनाचं संकट नाही तर इतर वादळंही येऊन गेली आहेत.

जिथे तुम्ही पोहचू शकला नाहीत तिकडे मी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जाऊन आलोय. त्यामुळे घराबाहेर पडत नाही अशी टीका करणाऱ्यांनी थोडे लक्षात घ्यावे. असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. तसेच कोरोनाशी सामना करताना काही गोष्टीचे पालन करण्यास मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. भेटायच असेल तर बंद जागेत भेटणं टाळा. एसीचा वापर करण्यापेक्षा हवा खेळती राहू द्या अडचणीच्या जागी, अपुऱ्या जागी थांबू नका असेही आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे.