उद्धव ठाकरेंना डॉक्टरांपेक्षा जास्त कोरोनाचा अभ्यास : डॉ. तात्याराव लहाने

मख्यमंत्री उद्ध ठाकरे यांना डॉक्टरापेक्षा जास्त कोरोनाचं ज्ञान आहे. मंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) आणि उद्धव ठाकरे (Udhav Thakre) यांच्या पाठिंब्यामुळेचं कोरोनाचा सामना यशस्वी करु शकलो, असंही डॉ. लहाने बोलत होते.

  • udhav thakre, tatyarao lahane, coronavirus, amit deshmukh

मुंबई : राज्यात कोरोनाने पुन्हा एकादा डोकं वर काढलं आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ठाकरे सरकार काय निर्णय घेणार, याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. याचं पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण संचालक, ज्येष्ठ नेत्र शल्य चिकित्सक डॉ. तात्याराव लहाने (Tatyarao Lahane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thakre) यांच्या यांच्या ज्ञानाचं कौतुक केलं आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच कोरोना विरुद्धच्या लढ्यात चांगली कामगीरी करु शकलो, असं लहाने यांनी सांगितलं.

दरम्यान रोज २ लाख टेस्ट करू शकू एवढ्या लॅब आज महाराष्ट्रात आहेत. राज्यातील कोरोना मृत्यूदर ३८ टक्क्यांवरून आज अडीच टक्क्यांच्याही खाली आला आहे. हे सरकारच्या सहकार्यामुळेच शक्य झालं, असं डॉ. तात्याराव लहाने म्हणाले.

अन्यथा पुन्हा लॉकडाऊन करावं लागेल ?

दरम्यांन रोज रुग्णांची संख्या वाढत राहिली तर लॉकडाऊन हा पर्याय असेल, असा ईशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. त्यामुळे आता राज्यात काही ठीकाणी निर्बंध घालण्यास सरु केले आहे. शासनाने काही मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. राज्यातील सर्व खासगी कार्यालयात ५० टक्के कर्मचारी उपस्थिती राहील अस स्पष्ट केलं आहे. पुणे, नागपूर, मुंबई, ठाणे आणि नाशिक ही पाच शहरं कोरोनाचे हॉटस्पॉट होत आहेत. त्यामुळे लोकांनी काळजी घ्यावी, नियम पाळावेत ही विनंती आहे. अन्यथा, पुन्हा लॉकडाऊन करावा लागेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.