शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात उद्धव ठाकरे घेणार विरोधकांचा समाचार? सर्वांना लागली उत्सुकता

शिवसेनेचा दसरा मेळावा भव्य आणि दिव्य स्वरुपात असा शिवाजी पार्क येथे होत असतो, मात्र कोरोनामुळं राजकीय सभा, सार्वजनिक कार्यक्रम यावर निर्बंध आले आहेत, त्यामुळं शिवेसेनेचा दसरा मेळावा सुमारे १२०० जणांच्या उपस्थितीत षण्मुखानंद सभागृहात होणार आहे. दसरा मेळावा शिवसैनिकांसांठी एक उर्जेचा स्रोतच जणू. बाळासाहेब ठाकरेंपासून ते उद्धव ठाकरेंपर्यंत दसरा मेळाव्याल्या शिवसैनिक हजारोंच्या संख्येनं गर्दी करतात आणि एक नविन उर्जा घेऊन पक्षाच्या कामाला सुरुवात करतात. पण तरीही उद्धव ठाकरेंच्या भाषणानं सैनिकांमध्ये तोच जोश पाहायला मिळतोय यंदाच्या मेळाव्यात ठाकरेंची तोफ कुणाकुणावर डागणार? ठाकरेंच्या तावडीत कोण सापडणार? सैनिकांना मेळाव्यात नवीन उर्जा मिळाणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

  मुंबई : दरवर्षी शिवतीर्थावर होणारा भव्यदिव्य दसरा मेळावा कोरोनाकाळात मागील दोन वर्षापासून बंद हॅालमध्ये कमी लोकांच्या उपस्थित होत आहे. शिवसेनापक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शुक्रवारी होणाऱ्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात काय बोलणार, याबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा भव्य आणि दिव्य स्वरुपात असा शिवाजी पार्क येथे होत असतो, मात्र कोरोनामुळं राजकीय सभा, सार्वजनिक कार्यक्रम यावर निर्बंध आले आहेत, त्यामुळं शिवेसेनेचा दसरा मेळावा सुमारे १२०० जणांच्या उपस्थितीत षण्मुखानंद सभागृहात होणार आहे. दसरा मेळावा शिवसैनिकांसांठी एक उर्जेचा स्रोतच जणू. बाळासाहेब ठाकरेंपासून ते उद्धव ठाकरेंपर्यंत दसरा मेळाव्याल्या शिवसैनिक हजारोंच्या संख्येनं गर्दी करतात आणि एक नविन उर्जा घेऊन पक्षाच्या कामाला सुरुवात करतात. पण तरीही उद्धव ठाकरेंच्या भाषणानं सैनिकांमध्ये तोच जोश पाहायला मिळतोय यंदाच्या मेळाव्यात ठाकरेंची तोफ कुणाकुणावर डागणार? ठाकरेंच्या तावडीत कोण सापडणार? सैनिकांना मेळाव्यात नवीन उर्जा मिळाणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

  विरोधकांवर तोफ डागणार?

  मागील काही दिवसांपासून केंद्रीय तपास यंत्रणा राज्यातील विविध नेते आणि सरकारमधील मंत्री यांच्यावर कारवाई करत आहे. हि कारवाई सूडबुद्धीने करत आहे का? ईडी, सीबीआय आणि आता एनसीबीच्या कारवाईवरही प्रश्नचिन्ह निर्माण केलं गेलं आहे. लखीमपूर प्रकरणात केंद्र सरकारचा चिडीचूपपणा, महाराष्ट्र बंद शेतकरीविरोधी धोरणं यावर उद्धव ठाकरे विरोधकांवर तोफ डागणार का? यावर देखील चर्चा सुरू आहे. राज्यातल्या शेतकरी धोरणं जाहीर करतील. कोरोनाकाळात मुंबई महाराष्ट्र वगळता ॲाक्सिजन आणि लसीवरून राजकारणावरही उद्धव ठाकरे जाहिरपणे बोलले, गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यपाल नियुक्त सदस्यांची नावं भगतसिंग कोश्यारी मंजूर करत नाहीत. तसेच विविध धोरणात राज्यपाल आणि सरकारमध्ये एकमत नसतानाचे बरेच राजकारण घडले. त्यामुळे ठाकरे राज्यपालांचाही समाचार घेतील का? हे पाहवे लागणार आहे.

  पालिका निवडणूक प्रचाराचा नारळ फोडणार?

  आगामी महानगरपालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवत सैनिकांसाठी हा मेळावा अत्यंत महत्वाचा आहे. दरम्यान पुढील वर्षीच्या सुरुवातीला होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा बिगुल उदधव ठाकरे फुंकतील, अशीही शक्यता आहे. गेली ३० वर्षे या महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे आणि टिकवायचीच या निर्धाराने ते शिवसैनिकांना काय संदेश देतात, हे पाहणेही महत्त्वाचे असेल. तसेच पालिका निवडणूक संदर्भात मोर्चेबांधणी किंवा नवीन काही धोरण आखणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे, तसेच शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांच्याविषयी शिवसेना नेते रामदास कदम यांची कथित ऑडिओ क्लिप, अनिल परब, खा. भावना गवळी यांच्यावर ईडीने केलेली कारवाई, माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी केलेले वक्तव्य याबाबत ठाकरे काय बोलतात, याविषयीदेखील उत्सुकता असेल. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असल्यानं उद्धव ठाकरेंच्या निशाण्यावर राज्यातले आणि केंद्रातले भाजपचे नेते असतील असं म्हटलं जातंय.

  शेतकरी आंदोलन आणि केंद्राची चिडिचूप भूमिका

  ‘महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणाला नवी दिशा देणारा दसरा मेळावा’ अशी या मेळाव्याची टॅगलाईन आहे. त्यामुळे राष्ट्रीय राजकारण, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप यांच्यावर ठाकरी शैलीत उद्धव ठाकरे फटकारे असतील, असे मानले जाते. मागील काही महिन्यांपासून कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी आंदोलन करत आहेत, पण केंद्र सरकार अजिबात त्यांना विचारात घेत नाहीय, केंद्र सरकारची मुळमुळीत भूमिका यावर उद्धव ठाकरे बोलणार का? तसेच लखमीपूर खेरी येथे शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घातल्याचे पडसाद संपूर्ण देशभर उमटले, त्याचा निषेध म्हणून सोमवारी महाराष्ट्र बंद करण्यात आला होता, यावर सुद्धा उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

  राज्यपाल व राज्यातील कोरोनाचे विरोधकांचे राजकारण

  शिवसेना महाविकास आघाडीसोबत जरी असली तरी सावरकरांना भारतरत्न देण्याची त्यांची आजही आग्रही मागणी राहिली आहे. त्यामुळे शिवसेनेचं सावरकर प्रेम अजुनही कमी झालेलं नाही. त्यामुळं नव्यानं सावरकरामुळे सुरु झालेल्या वादावर उद्धव ठाकरे खरपूस समाचार घेतील असं बोललं जातंय. तसेच राज्यातील शेतकरी धोरणं जाहीर करतील. कोरोना काळात मुंबई महाराष्ट्र वगळता ॲाक्सिजन आणि लसीवरून जे राजकारण रंगलं त्यावरून उद्धव ठाकरे जाहिरपणे बऱ्याचवेळा बोलले, पण आगामी निवडणुकांच्या पाश्वर्भूमिवर राज्यात काय काय केलं? हे सांगायला ठाकरे विसरणार नाहीत. तसेच गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यपाल नियुक्त सदस्यांची नावं भगतसिंग कोश्यारी मंजूर करत नाहीत. तसेच विविध धोरणात राज्यपाल आणि सरकारमध्ये एकमत नसतानाचे बरेच किस्से आहेत. त्यामुळे ठाकरे राज्यपालांचाही समाचार घेणार का? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

  दरम्यान शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला एक वेगळीच परंपरा आहे. गेली अनेक वर्ष शिवाजी पार्कच्या मैदानात ठाकरेंची तोफ धडधडायची. पण यंदा हा सोहळा षण्मुखानंद सभागृहात होणार आहे. त्यामुळे हजारोंच्या संख्येने भाषण देणाऱ्या ठाकरेंना यंदा मोजक्याच लोकांसमोर भाषण करावं लागणार आहे. पण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात पोहचण्यासाठी ॲानलाईनची व्यवस्था ठेवण्यात आली आहे. या मेळाव्याला शिवसैनिक, शिवसेनेचे नेते, मंत्री, आमदार विभागप्रमुख, महापौर आणि महापालिकेतले महत्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. त्यामुळं या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.