raj thakre and uddhav thakre

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे(balasaheb thakre) यांच्या जयंतीनिमित्त येत्या २३ जानेवारी रोजी त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मॅजेस्टिक समोर होणार आहे.या दिवशी राज ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(uddhav thakre) हे एकत्र येणार आहेत. त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुंबई: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे(balasaheb thakre) यांच्या जयंतीनिमित्त येत्या २३ जानेवारी रोजी त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मॅजेस्टिक समोर होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे(raj thakre) यांच्या कृष्णकुंज निवास्थानी जाऊन महापौर किशोरी पेडणेकर यांनी या कार्यक्रमाचे निमंत्रण त्यांना दिले. या दिवशी राज ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(uddhav thakre) हे एकत्र येणार आहेत. त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या कार्यक्रमाचे निमंत्रण महापौर पेडणेकर यांनी आज सकाळी १०.३० वाजता कृष्णकुंजवर जाऊन राज ठाकरे यांना दिले आणि या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे महापौरांनी निमंत्रण दिले.तब्बल १५ मिनिटे राज आणि महापौर यांच्यात चर्चा झाली. त्यावेळी राज यांनी शिवसेना प्रमुखांच्या अनेक आठवणी जागवल्या. नगरसेवक सचिन पडवळ यावेळी उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रण देण्यात येणार आहे. महापौरांनी राज यांना निमंत्रण दिल्यानंतर आता शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनाही भेटून त्या निमंत्रण देणार आहेत.

शिवसेनाप्रमुखांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याने त्यांच्या एकत्र येण्याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यावेळी दोघे भाऊ एकत्र आले होते. त्यांनतर तब्बल एक वर्षाने पुतळ्याच्या अनवरणासाठी हे दोघे भाऊ एकत्र येणार आहेत. त्यांच्या या एकत्र येण्याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.